सातारा: चाकूचा धाक दाखवत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटले, कार सोडून चोरटे पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 12:31 IST2022-10-01T12:29:23+5:302022-10-01T12:31:24+5:30

पेट्रोल पंपावरील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

A petrol pump employee was robbed at knifepoint, Incident at Aljapur on Phaltan-Satara road | सातारा: चाकूचा धाक दाखवत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटले, कार सोडून चोरटे पसार

सातारा: चाकूचा धाक दाखवत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटले, कार सोडून चोरटे पसार

सुर्यकांत निंबाळकर

आदर्की : चाकूचा धाक दाखवत अज्ञात चौघांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला लुटल्याची घटना घडली. यावेळी सुमारे तीस हजार रुपयांची रोख रक्कम या अज्ञातांनी लंपास केली. फलटण-सातारा रस्त्यावरील आळजापूर येथील एका पेट्रोल काल, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

याबाबत माहिती अशी की, अज्ञात चौघे लाल रंगाच्या कारमधून पेट्रोल पंपावर आले. यावेळी पंपावरील कामगाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्याजवळील तीस हजार रुपयाची रोख रक्कम काढून घेत अज्ञातांनी पळ काढला. यानंतर कर्मचाऱ्यांनी कारचा पाठलाग केला असता लोणंद जवळच्या हद्दीत ही कार सोडून चोरटे पसार झाले. पेट्रोल पंपावरील ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

रात्री लोणंदसह जिल्ह्यात मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र चोरटे त्या ठिकाणाहून पसार होण्यात यशस्वी झालेत. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे. याआधीही याच पंपावर दोन वेळा पेट्रोल- डिझेलची चोरीच्या घटना घडल्याने या पेट्रोल पंपाला चोरटयांनी लक्ष केल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: A petrol pump employee was robbed at knifepoint, Incident at Aljapur on Phaltan-Satara road