Satara: धोंडेवाडीत बिबट्याच्या बछड्याचा सर्पदंशामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:49 IST2026-01-02T13:49:11+5:302026-01-02T13:49:42+5:30
कराड (जि. सातारा) : धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात गुरुवारी एका उसाच्या फडात बिबट्याचा लहान बछडा आढळून आला. बछड्याला कराड ...

Satara: धोंडेवाडीत बिबट्याच्या बछड्याचा सर्पदंशामुळे मृत्यू
कराड (जि. सातारा) : धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात गुरुवारी एका उसाच्या फडात बिबट्याचा लहान बछडा आढळून आला. बछड्याला कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात नेण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. बछड्याचे शवविच्छेदन केले असता त्याचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे स्पष्ट झाले.
कराड तालुक्यातील धोंडेवाडीतील बेंद नावाच्या शिवारात एका उसाच्या फडात गुरुवार (दि. १) रोजी बिबट्याचा बछडा आढळून आला. तो आढळून आल्यानंतर परिसरातील ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. माहिती मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर बछड्याला कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यात आणण्यात आले. मात्र, दवाखान्यात आणण्यापूर्वी बछड्याचा मृत्यू झाला. त्याला दवाखान्यात आणण्यात आल्यानंतर त्याचे कराड तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये बछड्याचा मृत्यू सर्पदंशामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.