अखेरच्या दिवशी ७८, आजअखेर ३०५ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:29 IST2021-06-02T04:29:31+5:302021-06-02T04:29:31+5:30

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वडगाव हवेली-दुशेरे गटातील तीन जागांसाठी आजपर्यंत ५१ अर्ज दाखल झाले आहेत. काले-कार्वे ...

78 on last day, 305 applications filed till date | अखेरच्या दिवशी ७८, आजअखेर ३०५ अर्ज दाखल

अखेरच्या दिवशी ७८, आजअखेर ३०५ अर्ज दाखल

यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी वडगाव हवेली-दुशेरे गटातील तीन जागांसाठी आजपर्यंत ५१ अर्ज दाखल झाले आहेत. काले-कार्वे गटातील तीन जागासाठी ४३ अर्ज, नेर्ले-तांबवे गटातील तीन जागांसाठी ३३ अर्ज, रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातील तीन जागासाठी ५० अर्ज, येडेमच्छिंद्र-वांगी गटातील दोन जागांसाठी २४ अर्ज, रेठरे बुद्रुक-शेणोली गटातील दोन जागांसाठी ३० अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी ३३ अर्ज, अनुसूचित जाती-जमाती राखीव एक जागेसाठी १७ अर्ज, इतर मागास प्रवर्ग राखीव एक जागेसाठी १२ अर्ज, विजा-भज-विमाप्र राखीव एक जागेसाठी १२ असे एकूण २१ जागांसाठी ३०५ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी दि. २५ मे रोजी ६, दि. २७ मे रोजी २६, दि. २८ मे रोजी ८४, दि. ३१ मे रोजी ११४ तर १ जुन रोजी असे आजअखेर एकुण ७८ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी, दि. २ सकाळी अकरा वाजल्यापासून बाजार समिती सभागृहात अर्जांची छाननी होणार आहे. ३ ते १७ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत असून १८ जूनला अंतीम यादी प्रसिद्ध होणार आहे. तर २९ जूनला मतदान होणार आहे.

Web Title: 78 on last day, 305 applications filed till date