सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 17:12 IST2025-11-22T17:11:55+5:302025-11-22T17:12:57+5:30

Local Body Election: शेवटच्या दिवशी दिग्गजांसह अपक्षांच्या तलवारी म्यान; एकनाथ शिंदे यांच्या भगिनी राष्ट्रवादीत...

712 candidates in fray for 233 seats in nine municipalities in Satara district | सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

सातारा जिल्ह्यात नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी ७१२ उमेदवार रिंगणात, १३ उमेदवार बिनविरोध

सातारा : सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीचे राजकीय रणमैदान अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी पूर्णपणे मोकळे झाले. नऊ पालिकांमधून नगरसेवक व नगराध्यक्षपदाच्या मातब्बर व अपक्ष उमेदवारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली. आता नगरसेवक पदाच्या अंतिम लढाईत ७१२, तर नगराध्यक्ष पदासाठी ४३ उमेदवार रिंगणात आहेत. राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी (दि. २१) शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी गर्दी झाली. नऊ नगरपालिकांच्या २३३ जागांसाठी एकूण १ हजार ५१२, तर नगराध्यक्षपदाच्या ९ जागांसाठी १०४ उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात आले. उमेदवारांना दि. १९ ते २१ या कालावधीत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती.

पहिले दोन दिवस नाममात्र तर शेवटच्या दिवशी अनेक मातब्बरांनी निवडणुकीच्या रणांगणातून तलवारी म्यान केल्या. नऊ नगरपालिकांच्या २३३ नगरसेवक पदांसाठी आता ७१२ उमेदवार शिल्लक राहिले असून, या निवडणुकीत कुठे दुरंगी, कुठे तिरंगी तर कुठे राजकीय पक्षांमध्ये घमासान पाहायला मिळणार आहे. मेढा नगरपंचायतीत १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणार आहेत.

१३ उमेदवार बिनविरोध...

सातारा पालिकेच्या प्रभाग १३ मधून एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार विनोद खंदारे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. तर प्रभाग १२ अ मधून सर्व अपक्षांनी माघार घेतल्याने येथे मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे शिलेदार दिलीप म्हेत्रे बिनविरोध झाले. मलकापुरात भाजपच्या रंजना पाचुंदकर, वाईत राष्ट्रवादीच्या रेखा कांताराम यांनीदेखील बिनविरोधची पताका फडकविली. आता मलकापुरात सहा, साताऱ्यात तीन तर वाई दोन आणि मेढा नगरपंचायतीत दोन अशा एकूण १३ उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

एकनाथ शिंदे यांच्या भगिनीचा राष्ट्रवादीत...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानलेली बहीण असलेल्या विमल ओंबळे यांची जबाबदारी स्थानिक नेते कुमार शिंदे यांच्याकडे सोपवली होती; परंतु दोन दिवसांपूर्वीच कुमार शिंदे यांनी अचानक त्यांचा पाठिंबा काढून प्रतिस्पर्धी विमल बिरामणे यांच्याशी हातमिळवणी केली. ही बाब ओंबळे यांनी उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घातली. मात्र, तिकडूनही अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्या नाराज होत्या. अखेर त्यांनी मंत्री मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश जाहीर केला, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत.

साताऱ्याच्या लढतीकडे लक्ष...

सातारा पालिकेत नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘भाजप विरुद्ध महाविकास’ आघाडी अशी होणार आहे. तरीही एकूण नऊ उमेदवार एकमेकांना आव्हान देणार आहे. येथे नगरसेवकपदाच्या ५० जागांसाठी एकूण १६९ उमेदवार रिंगणात उरले असून, येथील लढती लक्षवेधी होणार आहेत.

Web Title : सतारा नगर पालिका चुनाव: 712 उम्मीदवार 233 सीटों के लिए मैदान में

Web Summary : सतारा नगर पालिका चुनावों में नौ नगर पालिकाओं की 233 सीटों के लिए 712 उम्मीदवार प्रतिस्पर्धा कर रहे हैं। तेरह उम्मीदवार निर्विरोध चुने गए। राजनीतिक पुनर्गठन हो रहा है, प्रमुख हस्तियां पार्टियां बदल रही हैं, जिससे प्रतिस्पर्धा तेज हो रही है, खासकर सतारा शहर में जहां अध्यक्ष पद के लिए भाजपा बनाम महाविकास अघाड़ी मुकाबला होने की उम्मीद है।

Web Title : Satara Municipal Elections: 712 Candidates Fight for 233 Seats

Web Summary : Satara municipal elections see 712 candidates vying for 233 seats across nine municipalities. Thirteen candidates are unopposed. Political realignments are occurring, with key figures switching parties, intensifying the competition, especially in Satara city where a BJP vs. Mahavikas Aghadi contest is expected for the president post.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.