शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ललिताच्या स्वागत मिरवणुकीत ५००० विद्यार्थी

By admin | Updated: August 24, 2016 00:32 IST

साताऱ्यात झांजपथकासह रॅली : शाळा, महाविद्यालयांचा सहभाग; विद्यार्थ्यांना पाणी, खाऊ वाटपाचा सहविचार सभेत निर्णय

सातारा : रिओ आॅलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या स्टिपलचेस स्पर्धेत अंतिम फेरीत मजल मारणाऱ्या ‘माणदेशी एक्स्प्रेस’ ललिबा बाबरचे साताऱ्यात होणारे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी पे्ररणादायी ठरण्यासाठी शासकीय बरोबर विविध क्रीडा संघटना प्रयत्नशील असून, या भव्य स्वागतासाठी शाळा व महाविद्यालयातील जवळपास पाच हजार विद्यार्थी रॅलीत सहभाग घेणार असल्याचे सांगण्यात आले. स्वागतासाठी झालेल्या सहविचार सभेत सांगण्यात आले. दि. २५आॅगस्ट रोजी ललिता बाबर ही साताऱ्यात सकाळी १० ते १२ या वेळेत येणार आहे. यावेळी तिच्या जंगी स्वागताच्या तयारीसाठी येथील शाहू स्टेडियममध्ये जिल्हा शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, मॅरेथॉन असोसिएशन संघटना जिल्हा अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक संघटना शालेय व महाविद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक यांची सहविचार सभा झाली.आॅलिम्पिकमध्ये ललिताने अंतिम फेरी गाठताना राष्ट्रीय विक्रम नोंदविला असून, नुकतीच तिची ‘अर्जुन’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पी. टी. उषानंतर आॅलिम्पिकची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर या भारतीय धावपटूने पराक्रम केला असून, सातारा जिल्ह्यातील आहे. त्यामुळे तिचे स्वागत हे अविस्मर्णीय राहण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे.गुरुवारी सकाळी १० वाजता येथील राजवाडा येथून ओपन जीपसीमधून ललिताची रॅली काढण्यात येणार आहे. यावेळी या स्वागत रॅलीत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग राहणार आहे. आरएसपी, स्काऊट गाईड, बॅण्डपथक, झांजपथक, लेझीमसह विद्यार्थी घोषणा देणार आहेत. तर मोती चौक ते कमानी हौद या मार्गाच्या दोन्ही बाजूस कन्या शाळेच्या जवळपास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी रॅलीच्या स्वागतासाठी थांबणार आहेत. ही रॅली राजवाडा ते कमानी हौद, शेटे चौक, पोवई नाका ते शाहू स्टेडियम अशी काढण्यात येणार असून, रॅली मार्गावर पाणी व विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी घेण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना ललिता बाबरला पाहायला मिळावे तसेच सर्वांनाच ललिता बाबर बनण्याची इच्छा निर्माण व्हावी व ललिता बाबर सारखे आपलेही स्वागत व्हावे, अशी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी, असे मत शिक्षण अधिकारी देवीदास कुलाळ यांनी स्पष्ट केले.रॅलीनंतर स्टेडियमवर भव्य स्वागत मंडप उभारण्यात येणार आहे. तर प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्यांचेही नियोजन केले जाणार आहे. तसेच स्वागतावेळी काही प्रमुख व्यक्तींचे मनोगत होणार असून, यानंतर ललिताचे स्वागत होणार आहे. या स्वागतानंतर ललिता पुढील कार्यक्रमास जाणार असल्याचे यावेळी क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)‘सातारा एक्स्प्रेसचा’ माणच्या मातीत गौरवदहिवडी : साताऱ्याची ‘माणदेश एक्स्प्रेस’ ललिता बाबर हिने ब्राझील या ठिकाणी झालेल्या ३१ व्या आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेत ३००० मीटर स्टिपलचेस या क्रीडाप्रकारात अंतिम फेरीत स्थान मिळविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला ठरली. भारत सरकारने या कामगिरीसाठी ‘अर्जुन’ पुरस्कार जाहीर केला. याबद्दल माणदेश गौरव समिती व समस्त माणदेश वासीयांकडून ललिता बाबर हिची दहिवडी शहरातून भव्य मिरवणूक व सत्कार सोहळा गुरुवार, दि. २५ आॅगस्ट २०१६ रोजी दहिवडी कॉलेज दहिवडी या ठिकाणी दुपारी ३ वाजता आयोजित केला असून, या माणदेश एक्स्प्रेसच्या आगमनावेळी तिचा भव्य सत्कार सोहळा व्हावा यासाठी मंगळवारी दहिवडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज हांडे, शिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, सिद्धनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील पोळ, चैतन्य पतसंस्थेचे अध्यक्ष नंदकुमार खोत उपस्थित होते. (प्रतिनिधी)