शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या गोशाळेत ४०० गायी

By admin | Updated: November 16, 2015 23:59 IST

करुणा मंदिर गोशाळा : गोधन सांभाळताना होतेय तारेवरची कसरत

वाई : वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेत भाकड गायींचे प्रमाण वाढल्याने त्यांचा सांभाळ करताना व्यवस्थापनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे़ प्रत्येक गायीला दररोज चाळीस रुपयांप्रमाणे खर्च अपेक्षित असून, सध्या करुणा मंदिरात चारशेंहून जास्त गायींचे संगोपन करण्यात येते़ त्यामुळेच गोशाळेस मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ शासनाने गोवंश हत्याबंदी कायद्याची कडक अंमलबजावणी केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु त्यामुळे वाढ झालेल्या गायींचे संगोपन करण्यासाठी शासनाने ठोस पाऊल उचण्याची गरज आहे़ शेतीपूरक व्यवसाय म्हणून गोधन संभाळत दूग्ध व्यवसाय करण्यासाठी शासन, संस्था, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना नेहमीच आवाहन करण्यात येते; परंतु गायी दूध देण्याचे बंद झाल्यानंतर भाकड गायींना सांभाळण्याची जबाबदारी शेतकरी झटकताना दिसतो. त्यामुळे अनेक वेळा भाकड गायींनी भरलेले ट्रक कत्तलखान्याकडे जाताना दुर्दैवाने दिसत आहेत़ काही संघटनांकडून त्यांना पकडून या गोशाळेत सोडण्यात येते; परंतु त्यांच्या संगोपनाची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही़ समाजात होणारे लहान-मोठ्या समारंभात अवास्तव खर्चाला फाटा देऊन करुण मंदिरसारख्या गोशांळाना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी या संघटनांकडून प्रबोधन करण्याची गरज आहे़ शासनाने फक्त गोवंश हत्या बंदी कायदा न करता अशा गोशाळांना अर्थिक मदत करण्याची आवश्यता आहे़ (प्रतिनिधी)गोशाळांना गरज मदतीची शासनाने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केल्याने शेतकरी वर्गातून गोशाळांना गायी दान करण्याचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गोशांळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे़ त्यामुळे शासनाने नियोजन करून गोशाळांना अनुदान देण्याचे तरतूद करावी. दुष्काळाची गंभीर समस्या असून, मागील दुष्काळाच्या काळाने शासनाने जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो उभारले होते़ सद्य:स्थिती दुष्काळामुळे चारा टंचाई असून, गोशाळांनाच छावणी व चारा डेपोसाठी आर्थिक साह्य करावे; अन्यथा करुणा मंदिर गोशाळेत गायींचा सांभाळ करणे अवघड होईल़ - दीपक ओसवाल, विश्वस्थ, करुणा मंदिर