'कृष्णा'च्या निवडणुकीतून २६ जणांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:48+5:302021-06-17T04:26:48+5:30

रेठरे बुद्रुक ता. कराड येथील यशवंतराव मोाहिते कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे.या निवडणुकीतून ...

26 candidates withdraw from 'Krishna' elections | 'कृष्णा'च्या निवडणुकीतून २६ जणांची माघार

'कृष्णा'च्या निवडणुकीतून २६ जणांची माघार

रेठरे बुद्रुक ता. कराड येथील यशवंतराव मोाहिते कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक २९ जून रोजी होत आहे.या निवडणुकीतून बुधवारी २६ जणांनी माघार घेतली. गुरुवार १७ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून, या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज मागे घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे -वडगाव हवेली-दुशेरे गट- काकासाहेब जगताप (वडगाव हवेली), कृष्णा जगताप (कोडोली), राजेंद्र चव्हाण (कोळे), बाबूराव जाधव (दुशेरे), काले कार्वे गट- विठ्ठलराव जाधव (आटके), प्रकाश पाटील (आटके), पारस पाटील (काले) नेर्ले-तांबवे गट- राहुल चव्हाण (बोरगाव), प्रदीप पाटील (कापूसखेड), द्वारकोजी पाटील (तांबवे), धनंजय थोरात (कालवडे), मनोज पाटील (नेर्ले), रेठरे हरणाक्ष बोरगाव गट- संदीप पाटील (उरूण), रेठरे बुद्रुक शेरे गट- मारूती निकम (शेरे), पांडुरंग निकम (शेरे), दीपक पाटील, (शेरे), येडे मच्छिंद्र गट- पांडुरंग मोहिते (मोहित्यांचे वडगाव) महिला राखीव गट- संगीता पाटील (बहे), अश्विनी जाधव (हिंगणगाव), ललिता थोरात (कालवडे), विमुक्त जाती गट- तात्यासाहेब लेंगरे (टेंभू), भटक्या जाती गट-गोविंद गावडे (रेठरे खुर्द), इतर मागास प्रवर्ग गट- संजय पुंभार (टेंभू), महादेव जंगम (कोरेगाव), अनुसूचित जाती गट- धनाजी गोतपागर (कोडोली), विमुक्त जाती गट- रमेश काकडे (धोंडेवाडी) यांनी अर्ज मागे घेतले. निवडणूक रिंगणात अजून १५५ अर्ज शिल्लक आहेत.

Web Title: 26 candidates withdraw from 'Krishna' elections