शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील २१ राजकीय आघाड्या अडचणीत

By admin | Updated: November 24, 2015 00:30 IST

निवडणूक आयोगाची नोटीस : कागदपत्रांअभावी नोंदणी रद्द होणार

सातारा : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत न जोडल्याने नोंदणी रद्द होणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये सातारा जिल्ह्यातील २१ राजकीय आघाड्यांचा समावेश आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.या राजकीय आघाड्यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. या पक्षांनी ३० डिसेंबर २०१५ पर्यंत संबंधित कागदपत्रांती पूर्तता न केल्यास राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे नोटीसमध्ये नमूद केले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सोमवारी मुंबईत दिली. नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना नियमितपणे आयकर विवरणपत्र व लेखा परीक्षित लेख्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक असते. त्याची पूर्तता न करणाऱ्या पक्षांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्येम्हसवड सिद्धनाथ पॅनेल, लोकमित्र जनसेवा आघाडी, लोकशक्ती विकास आघाडी, नगरविकास आघाडी, जनकल्याण आघाडी, सातारा विकास आघाडी, जनता परिवर्तन पॅनल, पाटण तालुका विकास आघाडी, लोकशाही आघाडी, खटाव-माण विकास आघाडी, फलटण शहर नागरी संघटना, जरंडेश्वर विकास आघाडी, महाराष्ट्र क्रांतिसेना, श्री लक्ष्मी डोंगराई देवी नगर विकास आघाडी, मलकापूर शहर विकास आघाडी, नागोबा आघाडी म्हसवड, नगर विकास आघाडी, राजेमाने पार्टी, जावळी विकास आघाडी, यशवंत विकास आघाडी, यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणामनिवडणूक आयोगाच्या नोटिसीमुळे रद्दबातल होण्याच्या मार्गावर असणाऱ्या राजकीय आघाड्यांच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आगामी नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकांमध्ये मतदारांसमोर जाताना पेच निर्माण होऊ नये, यासाठी आघाडीप्रमुखांना ३० डिसेंबरच्या आधी कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागणार आहे.