शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दोघेही अल्पवयीन; अपहरण करुन मुलीवर केले अत्याचार, मुलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 19:31 IST

सातारा : चार महिन्यांपूर्वी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १७ वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

सातारा : चार महिन्यांपूर्वी एका १४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर १७ वर्षांच्या मुलाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा व कोल्हापूर याठिकाणी नेऊन संबंधिताने हे कृत्य केले. याप्रकरणी अत्याचाराच्या आरोपावरून संशयित मुलावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसमवेत सद्या साताऱ्यात राहते. संशयित अल्पवयीन मुलाशी पीडित मुलीची ओळख होती. या ओळखीतून त्याने मुलीला ऑगस्ट-२०२१ रोजी आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी संबंधित मुला व मुलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही सापडले नव्हते. अखेर २ डिसेंबरला पोलिसांना हे दोघे कोल्हापूर परिसरात सापडले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही साताऱ्यात आणले. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. तसेच तिच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने सातारा व कोल्हापूर येथे अत्याचार केल्याचे सांगितले.याबाबत अधिक तपास सहायक पोलीस अधीक्षक ऑचल दलाल याकरीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी