शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

परळी खोऱ्यात १२० हातपंप नादुरुस्त

By admin | Updated: April 10, 2015 23:49 IST

नागरिक हतबल: ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची धास्ती

परळी : शासन एकीकडे पाणीटंचाई निवारण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे शासनाने लाखो रुपये खर्च करून बसविलेले हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत.नवीन विंधन विहिरींना खर्च करण्यापेक्षा या हातपंपाची दुरुस्ती केल्यास अनेक वाड्यांवरील पाणीटंचाईचा प्रश्न मिटू शकेल. एकट्या परळी, ठोसेघर भागात सुमारे १२० हातपंप नादुरुस्त स्थितीत असून, त्यांच्या दुरुस्तीची नेमकी जबाबदारी कुणाची? याचीच माहिती ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला नसल्याचे दिसून येते. दहा-बारा वर्षांपूर्वी पाणीटंचाई दूर करण्यासाठी गावातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर विंधन विहिरी खोदून त्यावर हातपंप बसविण्यात आले. सुरुवातीला दोन-तीन वर्षे हे हातपंप व्यवस्थित चालले. मात्र, त्यानंतर देखभाल दुरुस्ती होत नसल्याने हे पंप बंद पडले आहेत. परळी खोऱ्यातील ठोसेघर, लावंघर, करंजे, पाटेघर, कारी, निढळ, पोगरवाडी आदी भागांतील सुमारे १२० हातपंप गेले कित्येक वर्षे नादुरुस्त स्थितीत उभे आहेत. अनेक वर्षे विनावापर राहिल्याने ते गंजून गेले आहेत. त्या हातपंपाची मालकी कुणाची व दुरुस्तीची जबाबदारी कुणाची याची नेमकी माहिती अधिकाऱ्यांनाच नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत पंचायत समिती कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे हातपंपाची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. शासनच अशाप्रकारे उदासीन असेल तर हातपंपाची दुरुस्ती होणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (वार्ताहर)गावातील काही हातपंप नादुरुस्त आहेत. वारंवार पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागात याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या; परंतु यावर त्यांनी कोणतीच हालचाल केली नसून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. ऐन उन्हाळ्यात लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.-राकेश माने, डबेवाडी ग्रामस्थ