Satara: कराडच्या तासवडे एमआयडीसीत १२ तासांत १० स्फोट, विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 13:48 IST2026-04-01T13:47:16+5:302026-04-01T13:48:41+5:30

तर अंगाला खाज; अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनाही होऊ लागलाय त्रास

10 explosions in 12 hours at a chemical company in Taswade Industrial Estate in Karad taluka, Eye irritation due to toxic fumes | Satara: कराडच्या तासवडे एमआयडीसीत १२ तासांत १० स्फोट, विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ

Satara: कराडच्या तासवडे एमआयडीसीत १२ तासांत १० स्फोट, विषारी धुरामुळे डोळ्यांची जळजळ

कराड : कराड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीत साईराम केमिकल कंपनीत सोमवारी दिवसभरात १२ तासांत १० स्फोट झाल्याची थरारक घटना घडली. सकाळी साडेआठ वाजता झालेल्या पहिल्या भीषण स्फोटानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलिस यांनी देखील प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांनंतर तीन ते चार तासांनंतर आग नियंत्रणात आणण्यात आली.

मात्र, त्यानंतर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा स्फोट झाला. दरम्यान, केमिकलयुक्त काळ्या धुरामुळे नागरिक, अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांची मंगळवारपासून जळजळ होण्यास सुरुवात झाली असून, काहींच्या त्वचेला खास सुटू लागली आहे.

अजूनही धोका कायम!

केमिकल कंपनीत सोमवारी दिवसभरात १२ तासांत दहा स्फोट झाले असून अजून कंपनीत केमिकलने भरलेल्या दोन टाक्या आहेत. त्या टाक्या आतील केमिकलचा दाबाने फुगू लागल्या असून कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे कंपनी परिसरात अजूनही धोका कायम असल्याचे दिसते.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची गाडी घटनास्थळी

सोमवारी सकाळी साडेआठ वाजता तासवडे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला आग लागल्यानंतर भयानक स्फोटांची मालिका सुरू झाली. यामुळे हवेत केमिकलचा धुरांचे लोटच्या लोट पसरले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत प्रदूषण नियंत्रण महामंडळाची पुण्यातून अधिकाऱ्यांसह गाडी कंपनी परिसरात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दाखल झाली. अधिकाऱ्यांकडून मंगळवारी घटनेची माहिती घेण्याचे काम सुरू होते.

‘त्या’ स्फोटाचे असेही परिणाम...

केमिकल कंपनीमध्ये फ्रेशर रिॲक्शन रियाक्टरच्या ज्या टाक्या आहेत त्यामध्ये हवा भरण्याचे काम केले जात होते. त्या दहा टाक्या फुटून त्यातून विषारी केमिकल बाहेर पडले. त्यामुळे काही तासांनंतर ग्रामस्थांना श्वास घेताना अडचणी जाणवू लागल्या, तर काहींच्या अंगाची खाज होऊ लागली. केमिकल कंपनीतील फ्रेशर रिॲक्शन रियाक्टर अधूनमधून फुटत असून या स्फोटाने परिसर हादरला जात असल्यामुळे तळबीड पोलिसांनी कंपनी परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. लोकांना घटनास्थळावर जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

सोमवारी केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आग नियंत्रणात आणताना धूर थोड्याफार प्रमाणात डोळ्यांना लागला असून डोळ्यांची जळजळ होऊ लागली आहे. औषधोपचार देखील घेतले असून आता बरे वाटत आहे. - श्रीकांत देवघरे, अग्निशमन अधिकारी, कराड नगरपालिका
 

सोमवारी तासवडे एमआयडीसी साईराम केमिकल कंपनीत भीषण स्फोट झल्यानंतर घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी उपस्थित होतो. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास कंपनी परिसरातून परत आल्यानंतर पुन्हा स्फोट झाला. सुदैवाने याममध्ये जीवितहानी झाली नाही. दरम्यान, कंपनी परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. - रवींद्र भोरे, सहायक पोलिस निरीक्षक, तळबीड पोलिस ठाणे

Web Title : सतारा: तासवडे एमआईडीसी में विस्फोट, जहरीले धुएं से जलन

Web Summary : सतारा के तासवडे एमआईडीसी में 12 घंटों में दस विस्फोट हुए, जिससे जहरीले धुएं के कारण दमकल कर्मियों और नागरिकों को जलन हो रही है। रासायनिक टैंक अभी भी खतरा बने हुए हैं, जिसके कारण प्रदूषण नियंत्रण अधिकारियों द्वारा सुरक्षा उपायों और जांच जारी है। पुलिस घटनास्थल की निगरानी कर रही है।

Web Title : Satara: Tasawade MIDC Rocked by Explosions, Toxic Fumes Cause Irritation

Web Summary : Ten explosions rocked Tasawade MIDC in 12 hours, injuring firefighters and citizens due to toxic fumes. Chemical tanks remain a threat, prompting ongoing safety measures and investigations by pollution control authorities. Police are guarding the site.