शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

जिल्हा परिषदेत नेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र स्मृती दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:51 PM

Zp Sangli : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषद सांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देनेत्रतज्ज्ञ डॉ. भालचंद्र स्मृती दिन साजराजिल्हा परिषदेत राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम

सांगली : राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम प्रतिवर्षी 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने आज जिल्हा परिषदसांगली येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी डॉ. भालचंद्र यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील, डॉ. गायत्री वडगांवे, नेत्र चिकित्सा अधिकारी श्री. चांदोरकर, श्री. बाबर, नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील उपस्थित होते.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, डॉ. भालचंद्र यांनी रूग्णांसाठी अहोरात्र काम केले. त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात 10 जून 1924 रोजी झाला. खडतर परिस्थितीवर मात करत त्यांनी जिद्द व चिकाटीच्या बळावर 80 हजाराहून अधिक रूग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया व उपचार केले.

अंधांचे जीवन प्रकाशमय करणाऱ्या या दिपस्तंभाची ज्योत 10 जून 1979 रोजी मावळली. जयंती व स्मृती दिन एकाच दिवशी येतो. या दिवसाचे औचित्य साधून 10 जून हा दिवस डॉ. भालचंद्र स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नेत्रतपासणी शिबीरे करून सामान्य जनतेमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती केली जाते.प्रास्ताविकात नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील म्हणाले, प्रतिवर्षी दिनांक 10 ते 16 जून या कालावधीत डॉ. भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहअंतर्गत जिल्ह्यातील नेत्र शल्य चिकित्सक, नेत्रचिकित्सा अधिकारी व नेत्रदान समुपदेशक यांच्याकडून मधुमेह रूग्णांची फंडस्कोपी करणे तसेच म्यूकरमायकोसीस व डोळ्यांची निगा कशी राखावी याचे मार्गदर्शन या दिनानिमित्त केले जात आहे.

वेगवेगळी चर्चासत्रे आयोजित करणे व नेत्रदानाचाबद्दल जनजागृती करणे, लहान मुलांमधील अंधत्व, कोविड पश्चात तसेच म्युकरमायकोसीस या विषयावर वैद्यकीय महाविद्यालये, अशासकीय स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी तज्ज्ञ डॉक्टर यांच्यामार्फत प्रतिबंधक उपचार केले जात आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली