शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी आता पुन्हा रविवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

मिरज -जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा भाजप नेत्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही. निर्णयासाठी पुढील रविवारी (दि. १४) पुन्हा बैठक घेण्याचा ...

मिरज -जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा भाजप नेत्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही. निर्णयासाठी पुढील रविवारी (दि. १४) पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय रविवारी झाला. खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.

महापालिकेत बहुमत असतानाही सत्ता गमवाव्या लागलेल्या भाजप नेत्यांनी आता ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत काठावरचे बहुमत असल्याने पदाधिकारी बदलात धोका असल्याची शंका बैठकीत व्यक्त झाली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पदाधिकारी बदलाबाबत चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

जिल्हा परिषदेची मुदत नऊ महिने शिल्लक असून या काळासाठी पदाधिकारी बदल केला जावा, असा सदस्यांचा आग्रह आहे. त्यासाठीच्या बैठकीला सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, सम्राट महाडिक, नीता केळकर, मकरंद देशपांडे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर यांच्यासह अजितराव घोरपडे उपस्थित नव्हते. खाडे व गाडगीळ यांच्याशी बैठकीतून फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. बदलासाठी आपण सहमत असून निर्णयाची जबाबदारी खासदार पाटील यांच्याकडे आमदारांनी सोपविली.

जिल्हा परिषदेत भाजपच्या २३ सदस्यांना आ. बाबर, अजितराव घोरपडे व महाडिक समर्थक ९ जणांचा पाठिंबा आहे. भाजपचे काठावरचे बहुमत असून बदलत्या परिस्थितीत आमदार अनिल बाबर व अजितराव घोरपडे यांचा पाठिंबा कायम राहील याची खात्री नसल्याने जिल्हा परिषद पदाधिकारी बदलताना पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छुकांचा आग्रह असला तरी पदाधिकारी बदलासाठी सावधानतेने पावले टाकावी लागतील, अशीही चर्चा बैठकीत झाली. पदाधिकारी बदलाबाबत जिल्ह्यातील आमदार व सर्व नेतेमंडळींसोबत चर्चा करून चार दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

चौकट

आता रविवारी पुन्हा बैठक

बदलासंदर्भात रविवारी (दि. १४) नेतेमंडळी पुन्हा बैठक घेणार आहेत. बदलासंदर्भात आजच निर्णय जाहीर करण्यासाठी सदस्यांचा खासदार पाटील यांच्याकडे आग्रह होता, पण खाडे, गाडगीळ, दीपक शिंदे-म्हैसाळकर अनुपस्थित असल्याने पुढील रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.