सांगलीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का! जतमध्ये 'कमळ' फुललं, पण होम ग्राऊंडवर मागे पडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:31 IST2026-02-09T17:11:10+5:302026-02-09T17:31:12+5:30

सांगली जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. आटपाडी निंबवडे गटात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहिनी माधवी पडळकर (भाजप) विरुद्ध अॅड. विद्या मोटे (शिवसेना शिंदे गट) यांच्यात मेन फाईट होती.

Zilla Parishad Election result 2026 Big blow to Gopichand Padalkar in Sangli! 'Kamal' blooms in Jat, but home-grown candidate defeated; Gadala Khindar | सांगलीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का! जतमध्ये 'कमळ' फुललं, पण होम ग्राऊंडवर मागे पडले

सांगलीत गोपीचंद पडळकरांना मोठा धक्का! जतमध्ये 'कमळ' फुललं, पण होम ग्राऊंडवर मागे पडले

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. अनेक ठिकाणी मोठ्या लढती होत्या. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही अशाच लढती पाहायला मिळाल्या. खानापूर-विटा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे विरोधात भाजपा अशी लढत होती. या निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला.

ही निवडणूक चुरशीची झाली होती, कारण आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात भाजपचे वैभव पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठी ताकद लावली होती. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले होते. आमदार बाबर यांनी केलेल्या विधानाची राज्यभर चर्चा झाली होती. आटपाडी निंबवडे गटात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहिनी माधवी पडळकर (भाजपा) विरुद्ध अॅड. विद्या मोटे (शिवसेना शिंदे गट) यांच्यात लढत होती. या मतदारसंघाचा निकाल समोर आला आहे. यामध्ये भाजपाच्या पडळकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. ९८० मतांनी त्यांनी मोटे यांचा पराभव केला.

आमदार गोपीचंद पडळकर यांना होम ग्राऊंडवरच मोठा झटका बसला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. पडळकर यांनी जत तालुक्यात मोठा विजय मिळवला .पण, होम ग्राऊंडवर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी विजयानंतर जल्लोष केला. त्यांनी शड्डू ठोकून आनंद साजरा केला. त्यांनी भाजपाला चॅलेंज दिले आहे. खानापूरमधील या एकतर्फी निकालामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सुहास बाबर यांचे वजन वाढले आहे. 

माधवी पडळर विरुद्ध ज्योती मोटे यांच्या लढतीची चर्चा राज्यात झाली होती. शिवसेनेच्या उमेदवार मोटे यांच्या प्रचाराची गाडी फोडल्याचा आरोपही करण्यात आला होता. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. 

Web Title : सांगली में गोपीचंद पड़लकर को झटका; बीजेपी जीती, गृह क्षेत्र हारा।

Web Summary : सांगली जिला परिषद चुनाव में शिवसेना ने बीजेपी पर जीत हासिल की। गोपीचंद पड़लकर की पत्नी जीतीं, लेकिन उन्हें अपने गृह क्षेत्र में हार का सामना करना पड़ा। सुहास बाबर ने शिवसेना की जीत का जश्न मनाया।

Web Title : Setback for Gopichand Padalkar in Sangli; BJP wins, loses home ground.

Web Summary : Sangli Zilla Parishad elections saw Shiv Sena's victory over BJP. Gopichand Padalkar's wife won, but he faced defeat in his home ground. Suhas Babar celebrated Sena's win.