Sangli Crime: जत शहरात दगड, विटेने ठेचून तरुणाचा खून; दोघे संशयित ताब्यात, अनैतिक संबंधाचा संशय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:21 IST2026-02-10T17:21:37+5:302026-02-10T17:21:51+5:30

एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असतानाच हा खून झाल्याने खळबळ

Youth murdered by being crushed with stones and bricks in Jat sangli; Two suspects in custody, suspicion of immoral relationship | Sangli Crime: जत शहरात दगड, विटेने ठेचून तरुणाचा खून; दोघे संशयित ताब्यात, अनैतिक संबंधाचा संशय 

Sangli Crime: जत शहरात दगड, विटेने ठेचून तरुणाचा खून; दोघे संशयित ताब्यात, अनैतिक संबंधाचा संशय 

जत : जत शहरातील मार्केट कमिटीच्या आवारात २३ वर्षीय तरुणाचा दगड, विटेने ठेचून खून केल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मल्लेश सुरेश पुजारी असे मृत तरुणाचे नाव आहे. एकीकडे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक निकालाचा जल्लोष सुरू असतानाच हा खून झाल्याने खळबळ उडाली होती. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी तपासानंतर वर्तविला आहे. याप्रकरणी दोन संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील के. एम. हायस्कूलसमोर असणाऱ्या झोपडपट्टीत राहणारा मल्लेश पुजारी या तरुण जत बाजार समितीच्या आवारातील एका खताच्या गोदामाच्या कटट्यावर रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आला. बाजार समितीच्या आवारातील काही लोकांनी याची माहिती जत पोलिसांना दिली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपासाची चक्रे गतीने फिरवली. सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा जल्लोष सुरू असतानाच, हा खून झाल्याचे समजताच, एकच खळबळ उडाली होती. राजकीय वादातून हा खून झाला नाही ना? अशी चर्चा रंगली होती.

परंतु जत पोलिसांनी तातडीने तपास यंत्रणा फिरवत हा खून कुठल्याही राजकीय पार्श्वभूमीतून झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच खून अनैतिक संबंधातून झाल्याचा प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्राथमिक तपासानंतर दोघा संशयितांची नावे समोर आली. याप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत मल्लेश पुजारी याच्या डोक्यावर, तोंडावर, छातीवर, पायावर दगड, विटांनी मारल्याचे पंचनामा करताना दिसून आले. दगडाने ठेचल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन थोरबोले, पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी भेट दिली. रात्री उशिरा या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. पुढील तपास जत पोलिस करत आहेत.

दोघा संशयितांची नावे स्पष्ट

अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांच्या तपासात संशयित रोहित माने व अल्पवयीन साथीदार यांची नावे स्पष्ट झाली. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

Web Title : सांगली अपराध: जत में युवक की पत्थर से हत्या; दो संदिग्ध हिरासत में

Web Summary : सांगली के जत में 23 वर्षीय मल्लेश पुजारी की बेरहमी से हत्या कर दी गई। पुलिस को अवैध संबंध का शक है। दो संदिग्ध हिरासत में हैं। जांच जारी है।

Web Title : Sangli Crime: Youth Murdered in Jat; Two Suspects Detained

Web Summary : A 23-year-old youth, Mallesh Pujari, was brutally murdered in Jat, Sangli. Police suspect an illicit affair as the motive. Two suspects are in custody. Investigation underway.