Sangli Accident News: कुत्र्याला वाचवायला गेला अन् जीव गमावून बसला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 15:59 IST2025-10-20T15:59:03+5:302025-10-20T15:59:49+5:30
मध्यरात्री झाला अपघात

Sangli Accident News: कुत्र्याला वाचवायला गेला अन् जीव गमावून बसला
मिरज : मिरज-सांगली रोडवर मध्यरात्री समोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघातातसांगलीतील तरुणाचा मृत्यू झाला तर यामध्ये एक जण जखमी झाला. ही घटना रविवार, (दि.१९) मध्यरात्री अडीच वाजता घडली.
विश्वजीत दिलीप नाईक (वय २१, रा. डी-मार्ट पाठीमागे, सांगली) असे मृताचे नाव आहे. कारचालक नाईक मध्यरात्री भरधाव वेगात सांगलीला जात होते. यावेळी अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारवरील नियंत्रण सुटून रस्त्याकडेला असलेल्या जाहिरात फलकाच्या लोखंडी अँगलला धडकली.
या धडकेत विश्वजीतचा मृत्यू झाला, तर गाडीत बसलेला एक जण जखमी झाला. या अपघातात वाहनाचेही मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात योगेश भालचंद्र सूर्यवंशी (रा. विठ्ठल नगर, सांगली) यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सपोनि संदीप शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.