खोजानवाडीत शेततलावात बुडून युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:31 IST2021-08-19T04:31:06+5:302021-08-19T04:31:06+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क जत : खोजानवाडी (ता. जत) येथील शेततलावात बुडून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी ...

A young woman drowned in a farm pond in Khojanwadi | खोजानवाडीत शेततलावात बुडून युवतीचा मृत्यू

खोजानवाडीत शेततलावात बुडून युवतीचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्क

जत : खोजानवाडी (ता. जत) येथील शेततलावात बुडून १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. सावित्री आप्पासाहेब काराजनगी (वय १७) असे मृत युवतीचे नाव आहे.

खाेजानवाडी येथे बिळूर रस्त्यावर काराजनगी कुटुंबियांची शेती आहे. शेतात त्यांनी शेततळे खाेदले आहे. बुधवारी दुपारी सावित्री काराजनगी ही शेतातील शेततलावातून पाणी आणण्यासाठी गेली हाेती. अचानक पाय घसरून ती पाण्यात पडली. काही वेळाने हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला. त्यांनी पाण्यात उतरुन तिला बाहेर काढले. परंतु ताेपर्यंत तिचा मृत्यू झाला हाेता. याबाबत माहिती पोलीसपाटील चिदानंद कलमडी यांनी जत पाेलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच जत पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. जत ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत सावित्री खाेजानवाडी येथील हायस्कूलमध्ये बारावीत शिकत हाेती. नुकतीच ती बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली हाेती. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पाेलीस ठाण्यात नाेंद घेण्याचे काम सुरू हाेते. अधिक तपास पोलीस हवालदार मासाळ करीत आहेत.

180821\2211-img-20210818-wa0039.jpg

खोजानवाडीत शेततलावात बुडून मुलीचा मृत्यू

Web Title: A young woman drowned in a farm pond in Khojanwadi