शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

येळापूरच्या तरुणाकडून भावजय, पुतण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:28 IST

कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात ...

कोकरूड/पनवेल : चव्हाणवाडी (येळापूर, ता. शिराळा) येथील दिराने आपली भावजय व दोन वर्षांच्या पुतण्याची हत्या केल्याची घटना कामोठे शहरात सोमवारी रात्री उशिरा उघड झाली. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यातआली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हादाखल करण्यात आला आहे. जयश्री योगेश चव्हाण (वय २२) व अविनाश चव्हाण (२) अशी हत्या झालेल्यांची नावेआहेत.योगेश चव्हाण (मूळ गाव चव्हाणवाडी, येळापूर, ता. शिराळा) हे कामानिमित्त कामोठे सेक्टर ३४ येथील एकदंत सोसायटीतील रूम नंबर ३०४ मध्ये पत्नी जयश्री (२२), मुलगा अविनाश (२) व भाऊ सुरेश (३०) यांच्यासह राहतात. योगेश हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत असून सोमवारी ते कामावर गेले होते. सुरेश हा योगेशचा मोठा भाऊ असून अविवाहित आहे. त्यांचे आई-वडील हे गणपतीसाठी शिराळा, सांगली या आपल्या गावी गेले होते.सुरेश काही दिवसांपासून बेकार होता. काही कामधंदा करीत नसल्याने त्याचे घरातल्यांसोबत नेहमी खटके उडत होते. आई-वडील व भावासोबत भांडण होत असे. त्यातून काही दिवसांपूर्वी योगेशने सुरेशला घराबाहेर काढले होते. याच गोष्टीचा प्रचंड राग सुरेशच्या मनात होता. तोच राग मनात ठेवून सोमवारी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत सुरेश योगेशच्या घरी गेला. भावजय जयश्रीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने जयश्रीला ठार मारले. एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने जयश्रीचा दोन वर्षाचा मुलगा अविनाश याच्यावरही राग काढला. उशीने तोंड दाबून त्याचाही जीव घेतला. या प्रकारानंतर सुरेश घरात बसून राहिला व झोपी गेला.सोमवारी रात्री ११ च्या सुमारास योगेश घरी आल्यानंतर त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला.यावेळी सुरेश हॉलमध्ये झोपला होता तर जयश्री व मुलगा अविनाश यांचे मृतदेह बेडरूममध्ये आढळले. त्यामुळे योगेशने कामोठे पोलिसांना याबाबत माहिती दिली. कामोठे पोलिसांनी घटनास्थळावरून सुरेशला अटक केली आहे. याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असल्याचे कामोठे पोलिसांनी सांगितले.जयश्रीचा छळ झाल्याचा नातेवाइकांंचा आरोपजयश्री व अविनाश यांची सुरेशने दुपारीच हत्या केल्याचे समोर आले आहे. जयश्रीचे माहेर आटूगडेवाडी-मेणी (शिराळा, सांगली) येथील असून, तिचे योगेश सोबत ३ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. चव्हाण कुटुंबीय १५ वर्षांपासून कामोठे येथे राहत आहेत, तर सासरी जयश्रीचा छळ सुरू होता, असा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे.