गुढेत तीन कोटींची कामे : दुर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:33 IST2021-06-09T04:33:49+5:302021-06-09T04:33:49+5:30

कोकरुड : गुढे (ता. शिराळा) ग्राम पंचायतीने गत चार वर्षांत तीन कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे केली आहेत. मागासवर्गीय समाजास ...

Works worth Rs 3 crore in Gudhe: Durga | गुढेत तीन कोटींची कामे : दुर्गे

गुढेत तीन कोटींची कामे : दुर्गे

कोकरुड : गुढे (ता. शिराळा) ग्राम पंचायतीने गत चार वर्षांत तीन कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे केली आहेत. मागासवर्गीय समाजास वैयक्तिक आर्थिक लाभ देणारी शिराळा पश्चिम भागातील ही एकमेव ग्राम पंचायत असल्याची माहिती सरपंच सखाराम दुर्गे यांनी दिली.

ते म्हणाले की, आसूबाई मंदिर परिसर आणि रस्ता डांबरीकरणास ७२ लाख, बांबरवाडी अंतर्गत रस्ता, पेव्हिंग ब्लॉक १४ लाख, गुढे अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक, काँक्रिटीकरण ८ लाख, बांबरवाडी अंगणवाडी इमारत ८ लाख, ढाणकेवाडी अंतर्गत पेव्हिंग ब्लॉक आणि सामाजिक सभागृह, काँक्रिटीकरण ८ लाख पाटण, पशुवैद्यकीय संरक्षण भिंत आणि रस्ता गटर, काँक्रिटीकरण ३५ लाख अशी मोठी कामे करण्यात आली आहेत. त्याचबरोबर गुढे येथील मागासवर्गीय समाजासाठी सन १७/१८ मध्ये साहित्य आणि सार्वजनिक खर्चासाठी ४५,४१६ रुपये, सन १८/१९ साली समाज मंदिर दुरुस्ती, लोखंडी खिडकी, दरवाजे लाइट बिल यासाठी ३० हजार २२० रुपये रक्कम देण्यात आली आहे.

Web Title: Works worth Rs 3 crore in Gudhe: Durga