शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘तासगाव’चे कामगार राज्य बॅँकेस आज टाळे ठोकणार

By admin | Updated: July 24, 2014 23:27 IST

अवसायकाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी

भिलवडी : पलूस तालुका सहकारी साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये सुरू करण्यासाठी अवसायकाच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी शुक्रवार दि. २५ रोजी कामगार व ऊस उत्पादन शेतकरी कोल्हापूर येथील राज्य सहकारी बॅँकेच्या विभागीय कार्यालयास टाळे ठोकून आंदोलन करण्यात येणार आहे. २० जुलै रोजी तुरची (ता. तासगाव) येथे कारखाना कार्यस्थळावर झालेल्या कामगार, सभासद व ऊस उत्पादकांच्या बैठकीमध्ये आंदोलनाचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता गोरे यांनी दिला होता. उच्च न्यायालयाने तासगाव कारखाना अवसायकांच्या ताब्यात देण्याचे राज्य बॅँकेला आदेश दिले होते. मात्र डी. आर. ई. डी. न्यायालयात विक्री प्रक्रियेबाबत असलेली याचिका प्रलंबित असल्याचे कारण पुढे करून अवसायकांच्या ताब्यात देण्यास टाळाटाळ केली जात आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्य बॅँकेवर दबाव आणण्याची विनंती केली होती. पण राज्य बॅँकेचे अधिकारी आमचे ऐकत नसल्याचे सांगून हात वर केले.शेवटचा पर्याय म्हणून कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत पहिल्या टप्प्यांमध्ये २५ जुलैला कोल्हापूर येथील बॅँकेच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात येणार आहे. तासगाव पलूस तालुक्यातील पाचशेवर कामगार व कारखान्याचे सभासद या आंदोलनात सहभागी आहेत. (वार्ताहर)