शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुका विभाजनाचे काम शासनाचे

By admin | Updated: November 17, 2016 23:15 IST

याचिकाकर्त्यांना निर्देश : मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिका निकाली

मुंबई : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याचे विभाजन करून संख हा नवा तालुका निर्माण करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका निकाली काढत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना राज्य सरकारकडे निवेदन करण्याचे निर्देश दिले. सरकारला याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची सूचना केली. तालुक्यांची निर्मिती करणे किंवा विभाजन करण्याचे काम राज्य सरकारचे आहे. याबद्दलची चर्चा सरकारकडे व्हायला पाहिजे, न्यायालयात नाही. हा सरकारच्या धोरणाचा भाग असल्याने न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे म्हणत मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने सांगलीचे रहिवासी बसवराज जिगजेनी व अन्य जणांची दाखल केलेली जनहित याचिका निकाली काढली. जिगजेनी यांनी विनोद सांगवीकर यांच्यातर्फे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, सांगलीतील जत तालुक्यांतर्गत १२५ गावे येतात. त्यात ११७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्याच्या क्षेत्रफळाएवढे जत तालुक्याचे क्षेत्रफळ आहे. मात्र हा तालुका सतत दुष्काळी असल्याने या तालुक्याचा विकास खुंटला आहे. या तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असल्याने येथील नागरिकांपर्यंत शासकीय योजना व सुविधा पोहोचतच नाहीत. येथील नागरिकांना तहसील कार्यालय गाठण्यासाठी ९० किलोमीटरचा पल्ला पार पाडावा लागतो. त्यामुळे हा भाग मागासच राहिला आहे. तालुक्यातील नागरिकांचा विकास करण्यासाठी राज्य सरकारला जत तालुक्याचे विभाजन करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिकाकर्त्यांना सरकारकडे निवेदन करण्याचे निर्देश दिले, तर सरकारला या निवेदनावर निर्णय घेण्यास सांगितले. (प्रतिनिधी) विभाजनाचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा जत तालुक्यातील जनतेच्या भावना व सोयी-सुविधा यांचा विचार करून आणि कायद्याच्या चौकटीत राज्य शासनाने जत तालुका विभाजनाचा निर्णय त्वरित घ्यावा. यासाठी राज्य शासन सक्षम असून त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. आम्ही केलेली मागणी योग्य आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केले असून, यासंदर्भात राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असा आदेश दिल्याची प्रतिक्रिया संख (ता. जत) येथील अ‍ॅड. बसवराज जिगजेनी यांनी दिली.