शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आमदार ठरणार काही तासातच

By admin | Updated: October 18, 2014 23:46 IST

प्रशासन सज्ज : दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल अपेक्षित, सात ठिकाणी होणार मतमोजणी

सांगली : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, सात मतमोजणी केंद्रांवर ही मतमोजणी होत आहे. जिल्ह्यातील सर्व निकाल दुपारी बारापर्यंत अपेक्षित आहेत. मिरज व सांगली विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी येथील मिरज रस्त्यावरील केंद्रीय शासकीय गोदामात होणार आहे. इस्लामपूरची मतमोजणी एम बी शासकीय अन्नधान्य गोदाम येथे, तर शिराळ्याची मतमोजणी आयटीआय शिराळा (पहिला मजला) येथे होत आहे. पलूस-कडेगाव मतदारसंघाची कडेगाव औद्योगिक वसाहतीतील आयटीआय महाविद्यालयात, खानापूरची विट्यातील खानापूर-विटा रस्त्यावरील शासकीय अन्नधान्य गोदाम, तासगाव-कवठेमहांकाळची तासगावच्या तहसील कार्यालयाजवळच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये आणि जतची मतमोजणी जतच्या शासकीय गोदाम येथे होत आहे. सकाळी आठ वाजता मतदानाच्या प्रत्यक्ष मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. प्रारंभी टपाली मतदानाची मोजणी होणार आहे. मतमोजणीच्या विधानसभा मतदारसंघनिहाय १९ ते २४ फेऱ्या होणार आहेत. मिरज, सांगली, तासगाव व इस्लामपूर मतदारसंघात २० फेऱ्या होणार आहेत. शिराळ्यासाठी २३ फेऱ्या, पलूस-कडेगाव व जत विधानसभेसाठी १९ फेऱ्या, तर खानापूरसाठी २४ फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरी सर्वसाधारणपणे पंधरा मिनिटाची असेल. मतमोजणीसाठी जिल्ह्यात ८५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतमोजणीचे काम १४ टेबलांवर केले जाणार असून, एक टेबल टपाली मतदानाच्या मोजणीसाठी निश्चित केले आहे. प्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)