शहरं
Join us  
Trending Stories
1
EXCLUSIVE: "१६ तारखेनंतर आम्ही पुन्हा एकत्र चहा घेऊ..."; राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले CM फडणवीस?
2
काका-पुतणे एकत्र येणार? अजित पवार स्पष्टच म्हणाले, "यावरून काय ओळखायचं ते ओळखा"
3
‘ट्रम्प यांना जावं लागेल…’, महिलेच्या मृत्यूवरून अमेरिकेत प्रक्षोभ, आंदोलक रस्त्यावर, कोण होती ती?  
4
Exclusive: ठाकरेंच्या युतीमुळे भाजपा बॅकफूटवर? देवेंद्र फडणवीसांनी सांगितली जागावाटपाची इनसाईड स्टोरी
5
"महेश मांजरेकर यांनी राजकारणात पडू नये, नाहीतर आम्ही त्यांना..."; ठाकरेंच्या मुलाखतीनंतर भाजपाचा इशारा
6
अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्याने चीनचा मार्ग मोकळा झाला, तैवानचं टेन्शन वाढणार?
7
महाकालेश्वरच्या भाविकांचा कन्नड घाटात भीषण अपघात; तिघांचा मृत्यू, चार जणांची मृत्यूशी झुंज!
8
"साहेबांचा आदेश माझ्यासाठी अंतिम..." ५ दिवसांपूर्वी पोस्ट अन् आज मनसेला केला रामराम
9
मिरजेत अजित पवार गटाला मोठा धक्का! उमेदवार आझम काझींसह ८ जण कोल्हापूर-सांगलीतून हद्दपार
10
मुस्लिम मतांची गरज नाही, त्यांच्या घरीही जात नाही; भाजपा आमदाराच्या विधानानं वाद, Video व्हायरल
11
चांदीत गुंतवणुकीची घाई नको! २०२९ पर्यंत कशी असेल चाल? जागतिक बँकेने सांगितली रणनीती
12
"अंबरनाथ आणि अकोटमधील युतीने भाजपाचा दुतोंडी चेहरा उघड झाला", हर्षवर्धन सपकाळ यांची टीका   
13
मुंबईत जन्माचा मुद्दा! CM फडणवीसांचा आवाज वाढला, राज ठाकरेंना म्हणाले, "मला कळत नाही, तुम्हाला कळतं, तर मग..."
14
Makar Sankrant 2026: यंदा संक्रांत आणि एकादशीचा दुर्मिळ योग; खिचडी नाही, तर करा 'या' वस्तूंचे दान
15
बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, केल्या ३ मागण्या
16
एकनाथ शिंदेंचा एक फोन, लगोलग कट्टर शिवसैनिकाची घेतली भेट; लालबाग-परळमध्ये रात्री काय घडलं?
17
"कार्यकर्ते तुमचे गुलाम नाहीत"; बाळासाहेबांचं नाव घेत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना बरंच सुनावलं
18
Kishori Pednekar: किशोरी पेडणेकर अडचणीत सापडण्याची शक्यता, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार, नेमके प्रकरण काय?
19
तेलाचा टँकर जप्त केल्याने तणाव वाढला, जर युद्ध झालं तरं रशियाची ही शस्त्रे अमेरिकेला पडतील भारी
20
ट्रम्प टॅरिफचा फटका! या भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचं मोठं नुकसान; ५० टक्यांनी घसरला भाव
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: मुंबईत दोस्ती, मात्र सांगलीत प्रेमाची कुस्ती; महायुतीत ‘दोस्ता’वर आरोप जपूनच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:41 IST

प्रचार रंगेल, तशी ही कुस्ती लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे

सांगली : राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीच्या घटक पक्षांची महापालिका निवडणुकीतील भूमिका मात्र सोयीचीच ठरली आहे. मुंबईत दोस्ती करताना सांगलीत मात्र प्रेमाची कुस्ती रंगली आहे. ही प्रेमाची कुस्ती काही ठिकाणी जोरदार संघर्षाची ठरली आहे.महापालिका निवडणुकीत पक्षाविरुद्ध बंड केलेल्या कार्यकर्त्यांना थंड करण्यात भाजपला पूर्ण यश आलेले नाही. नाराज इच्छुकांनी शिंदेसेना, राष्ट्रवादी पक्षाचे एबी फॉर्म मिळवत बंडाचा झेंडा फडकविला आहे. त्यामुळे पक्षाला स्वकियांसोबतच महायुतीच्या घटक पक्षांच्या उमेदवारांचाही सामना करावा लागणार आहे. राज्याच्या सत्तेत भाजपसोबत राष्ट्रवादी (अजित पवार), शिंदेसेना व अन्य काही पक्ष आहेत. महापालिका निवडणुकीत मात्र ही दोस्ती फुटली असून, सारे पक्ष कुस्तीच्या मैदानात परस्परविरोधात आहेत. स्थानिक गरज आणि सोयीनुसार युती करण्याची किंवा स्वतंत्र लढण्याची घोषणा या पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत केली होती. पण युती करण्यात ते अपयशी ठरले, त्यामुळे महापालिकेच्या रणमैदानात कुस्ती रंगली आहे. भाजप आणि शिंदेसेना यांच्या तुलनेत महायुतीचा तिसरा घटक पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र सुरुवातीपासूनच ‘एकला चलो रे’ या आक्रमक भूमिकेत होता. पक्षाने शेवटपर्यंत युती किंवा आघाडीसाठी प्रयत्न न करता स्वतंत्र लढण्याचे धोरण काय ठेवले. अनेक प्रभागात हे तीनही पक्ष आमनेसामने आहेत.अर्थात, काही प्रभागांत अजित पवार गट आणि भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ असल्याचीही चर्चा आहे. तर काही ठिकाणी अजित पवार गटाची काँग्रेससोबत दोस्तीत कुस्ती असल्याचे बोलले जाते. फक्त ३३ जागांवर उमेदवार उभे केलेल्या अजित पवार गटाने उर्वरित ४५ जागा जणू मित्रपक्षांसाठीच सोडल्या आहेत. या जागांवर फक्त दोस्तीच दिसत आहे. निवडणुकीचा प्रचार रंगेल, तशी ही कुस्ती लढाईत रूपांतरित होताना दिसत आहे.

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पक्षात सामील करून घेतले आहे, त्याच धर्तीवर अजित पवार गटानेही भाजपच्या काहींना प्रवेश दिले आहेत. त्यामुळे या पक्षांत निवडणुकीपूर्वीच कुस्ती सुरू झाली होती. आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असताना ही कुस्ती रंगात आली आहे.

चिन्ह पोहोचविण्याचे धोरणमहापालिकेत स्वतंत्र लढण्यामागे अजित पवार गटाचे घड्याळ चिन्ह घरोघरी पोहोचविण्याचेही धोरण आहे. पक्षसंघटन मजबूत करणे आणि त्याद्वारे भविष्यातील अन्य निवडणुका स्वतंत्र लढविणे, हादेखील हेतू दिसत आहे.

होय, मुंबईत दोस्तीचमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वत:च सांगलीत बोलताना महायुतीतील दोस्तीवर शिक्कामोर्तब केले. `सांगलीत किंवा अन्यत्र मित्रपक्ष भाजपसोबत लढाई असली तरी मुंबईत मात्र आम्ही एकच आहोत,` असा त्यांचा सूर होता. `मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी रात्री झाला असून, मुंबईचा महापौर युतीचाच होईल,` असा दावा त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Municipal Election: Allies Clash Locally Despite Unity in Mumbai

Web Summary : Maharashtra's ruling coalition partners clash in Sangli's municipal election, despite alliance in Mumbai. BJP faces rebels and coalition candidates. NCP prioritizes independent fight, aiming to strengthen party for future elections. Local dynamics overshadow state-level alliances.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार