शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’ची दिवाळी गोड होणार का?

By admin | Updated: October 2, 2015 23:44 IST

मोफत साखर, पण पाचशे कोटींचे कर्ज : हंगाम पार पाडण्यासाठी कसरत

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर एकीकडे साखर उद्योग संकटात आल्यामुळे येणाऱ्या हंगामात उसाला चांगला दर देणे शक्य नसल्याचे साखर कारखानदार सांगत आहेत, तर दुसरीकडे कृष्णा कारखान्याने सभासदांना मोफत साखर देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सभासदांना मोफत साखरेतून मिळालेली दिवाळी भेट गोड लागणार का, याचे उत्तर सध्यातरी गुलदस्त्यात आहे. कारण पाचशे कोटींचे कर्ज असणाऱ्या ‘कृष्णा’ला हंगाम पार पाडण्यासाठी दिव्य पार करावे लागणार आहे. कऱ्हाड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्तासंघर्षात सहकार, रयत व संस्थापक पॅनेलच्या नेत्यांनी सभासदांवर आश्वासनांची खैरात केली होती. सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी सभासदांना मोफत साखर देण्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांचे पॅनेल सत्तेवर आल्यानंतर पहिल्याच वार्षिक सभेत मोफत साखर देण्याचा ठराव करण्यात आला. याचवेळी कारखान्यावर पाचशे कोटी रुपयांचे कर्ज आहे, कारखाना चालविताना अनेक अडचणी येत आहेत, ही दूसरी बाजूही त्यांनी सभासदांसमोर मांडली होती. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कामगार भरती केल्याचे सत्ताधाऱ्यांकडून सांगितले जाते. अशा अतिरिक्त कामगारांना कमी करण्यात आले आहे. त्यातूनही विद्यमान संचालकांच्या मर्जीतील कामगारांना पुन्हा कामावर घेतले आहे. मात्र कामगारांच्या पगारापोटी होणाऱ्या खर्चातही मोठी कपात करून, येणारा हंगाम कमीत कमी कर्मचाऱ्यांवर पूर्ण केला जाणार आहे. या हंगामात ऊस उत्पादकांच्या पदरात चांगला ऊस दर पडणार, की मोफत साखरेवरच गोड मानून घ्यावे लागणार, हे आता येणारा काळच ठरवणार आहे. तोपर्यंत मात्र वाट पाहावी लागणार.