शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी भरतो; पण ‘डोंगरवाडी’ सुरू करा

By admin | Updated: August 20, 2015 22:50 IST

शेतकऱ्यांची कळकळीची मागणी : सोनीत आवर्तनाच्या नियोजनासाठी बैठक

सोनी : डोंगरवाडी योजनेची पाणीपट्टी २५ आॅगस्टपर्यंत भरतो; पण शेतीला पाणी दिले तरच द्राक्षबागांची छाटणी घेणे शक्य आहे अन्यथा पाण्यावाचून करपलेली पिके पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर येईल, अशी कळकळीची मागणी शेतकऱ्यांनी सोनी (ता. मिरज) येथे डोंगरवाडी योजनेच्या पाणीपट्टी भरणे व पुढील आवर्तनाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत केली.म्हैसाळ कालव्याच्या डोंगरवाडी योजनेतून सोनीसह लाभक्षेत्रातील २२ गावांना पाणी सोडले जाते; पण विजबिल थकित असल्याने सध्या योजना बंदच आहे. त्यातच पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके वाळली आहेत. परिसरात द्राक्षबागेचे क्षेत्र मोठे आहे. आता माल छाटणी घेण्याची वेळ आली आहे, पण बोअर, विहिरीला पाणी कमी असल्याने छाटणी घेणे अशक्य आहे. त्यासाठी डोंगरवाडी योजनेतून पाणी सुटले तर, परिसरातील द्राक्षबागायतदार शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही, यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. ग्रामपंचायतीने गावासह वाडी-वस्तीवर ध्वनिक्षेपक लावून बैठकीची माहिती दिल्याने मोठ्याप्रमाणात शेतकरीवर्ग बैठकीला हजर होता. द्राक्षबागा जगवण्यासाठी एका टॅँकरला १५०० रुपये मोजले आहेत. पाण्याची किंमत चांगली माहीत असल्यामुळे आम्ही येत्या २५ आॅगस्टपर्यंत एक एकरला १००० रुपयेप्रमाणे पैसे भरतो, पण पाणी लवकर सोडा, अशी मागणी केली. यावेळी जि. प. सदस्य राजेंद्र माळी, बाजार समितीचे संचालक दिनकर पाटील, सरपंच शामजी ढोबळे, संघर्ष समितीचे अरविंद पाटील, सुरेश मुळीक, गजानन पाटील यांच्यासह पाटबंधारे विभागाचे एस. डी. शिंत्रे व एम. एच. चव्हाण उपस्थित होते. (वार्ताहर)ज्या गावांची पाणीपट्टी, त्याच गावांना पाणी डोंगरवाडी योजना पाईपलाईन टाकून केली असल्याने ज्या गावातील पाणीपट्टी भरली जाते, त्याच गावाला पाणी सोडता येते. त्यामुळे पाणीपट्टी न भरणाऱ्या गावांना याचा फायदा होणार नसून, नियमित पाणीपट्टी भरणारी गावे किंवा वाडी-वस्तीला याचा लाभ होणार असल्याने पाणीपट्टी भरणे अनिवार्य आहे, असे सांगण्यात आले.