शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

Sangli: चांदोलीतील पाणीसाठ्यात चार महिन्यात १३ टीएमसीने घट, तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2024 12:24 IST

गतवर्षीपेक्षा ५ टीएमसी कमी पाणी 

विकास शहाशिराळा : चांदोली (ता. शिराळा) धरण पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने ३ ऑक्टोबर राेजी धरणाचे चारही वक्राकार दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत हाेते. परिणामी गेल्या पाच महिन्यात धरणातील पाणीसाठा १३ टीएमसीने घटला आहे. गतवर्षीपेक्षा यंदाचा पाणीसाठा ३ टीएमसीने कमी आहे.

सध्या केवळ वीजनिर्मिती केंद्रातून १५८५ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामध्ये कालव्यांमध्ये ३५० क्यूसेक तर वारणा नदीत १२३५ क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात केवळ १४.५८ टीएमसी (५२.९७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबर राेजी चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर केवळ वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. गेल्या पाच महिन्यात १३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. यावर्षी या धरण परिसरात आजअखेर १८८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चांदाेली धरणाची पाणी साठवण क्षमता ३३.४० टीएमसी असून सध्या पाणीसाठा २१.४६ टीएमसी (६२.३८ टक्के) तसेच उपयुक्त साठा १४.५८ टीएमसी (५२.९७) आहे. गेल्या पाच महिन्यात १३ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा २१.४३ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी २.९५ टीएमसी कमी आहे.मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावे तसेच औद्योगिक वसाहतीला पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होत आहे.

मोरणा धरणात सध्या ३२ टक्के तर कार्वे व रेठरे धरण तलावात २० टक्के पाणीसाठा आहे. तालुक्यातील पाच पाझर तलाव कोरडे पडले आहेत. इतर तलावातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होत आहे. वाकुर्डे योजनेचे पाणी सोडल्याने करमजाई धरण व हत्तेगाव, रेड, बेलदारवाडी, इंग्रुळ तलाव ९० टक्के भरले आहेत. ३३० कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली आहे.

आजची स्थिती

  • एकूण क्षमता ३४.४० टीएमसी
  • धरण पाणीसाठा : २१.४६ टीएमसी (६२.३८ टक्के)
  • उपयुक्त पाणीसाठा : १४.५८ टीएमसी (५२.९७ टक्के)
  • एकूण पाऊस : १८८९ मिलिमीटर

विसर्ग

  • वीजनिर्मिती केंद्रातून : १५८५ क्यूसेक
  • कालव्यामध्ये : ३५० क्यूसेक
  • नदीपात्रात : १२३५ क्यूसेक
टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी