सांगलीतील काळी खणीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे, नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 15:59 IST2026-02-06T15:58:48+5:302026-02-06T15:59:12+5:30

प्रदूषण मंडळाची कार्यवाही 

Water samples from Kali Khani in Sangli sent to laboratory for testing | सांगलीतील काळी खणीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे, नागरिकांच्या तक्रारीची घेतली दखल

संग्रहित छाया

सांगली : महापालिकेच्या काळी खण परिसरातील सुशोभीकरण प्रकल्पाबाबत करण्यात आलेल्या गंभीर तक्रारींची दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून मलमिश्रित पाण्याचे नमुने ताब्यात घेतले आहेत. हे नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

काळी खण प्रकल्पाचा मूळ उद्देश प्रदूषित पाण्याचे शुद्धीकरण करून ते नागरिकांच्या वापरायोग्य स्वरूपात आणणे हा होता. मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प पर्यावरण संरक्षणाऐवजी केवळ सौंदर्यीकरणापुरताच मर्यादित ठेवण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून अनेक कामे नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, प्रस्तावित १८ मीटर रुंदीचा रस्ता १२ मीटरपर्यंत अरुंद करण्यात आला. रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी अरुंदीकरण करण्यात आले असून, नियमबाह्य पद्धतीने पादचारी मार्ग वाढविण्यात आले आहेत. सार्वजनिक सुरक्षितता व आवश्यक अंतराचे निकष डावलण्यात आल्याचा आरोपही तक्रारदारांनी केला आहे.

या पार्श्वभूमीवर प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रेमनगर परिसरासह काळी खण येथे भेट देऊन ज्या ठिकाणाहून मलमिश्रित पाणी खणीत मिसळत आहे, त्या ठिकाणची पाहणी केली. यावेळी पाण्याचे नमुने घेण्यात आले. पाहणीदरम्यान महापालिकेचे उद्यान अधीक्षक, स्वच्छता निरीक्षक, बांधकाम विभागाचे अधिकारी राजपूत, तक्रारदार शंभूराज काटकर, तानाजीराव रुईकर, पर्यावरण विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाची पुढील भूमिका स्पष्ट होणार आहे. आवश्यक ती कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन तसेच कायदेशीर लढा देण्याचा इशारा तक्रारदार व आंदोलकांनी दिला आहे.

Web Title : शिकायतों के बाद सांगली की काली खदान के पानी के नमूने परीक्षण के लिए भेजे गए

Web Summary : शिकायतों के बाद, सांगली की प्रदूषित काली खदान के पानी के नमूने प्रयोगशाला परीक्षण के लिए लिए गए। सौंदर्यीकरण परियोजनाओं, संकरी सड़कों और सुरक्षा मानकों से समझौता करने में कथित अनियमितताओं की चिंता है। आगे की कार्रवाई प्रयोगशाला रिपोर्ट पर निर्भर करती है; विरोध की धमकी दी गई है।

Web Title : Sangli's Black Quarry Water Samples Sent for Testing After Complaints

Web Summary : Following complaints, Sangli's polluted Black Quarry water samples were taken for lab testing. Concerns include alleged irregularities in beautification projects, narrowed roads, and compromised safety standards. Further action depends on the lab report; protests are threatened.