इस्लामपुरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST2021-04-09T04:27:47+5:302021-04-09T04:27:47+5:30

इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरातील विविध ...

A warning of hunger strike for smooth water supply in Islampur | इस्लामपुरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उपोषणाचा इशारा

इस्लामपुरात सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी उपोषणाचा इशारा

इस्लामपूर येथे उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : शहरातील विविध गल्ल्या आणि उपनगरांमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. स्थानिक रहिवाशांनी पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल घेतली गेलेली नाही. १४ एप्रिलपूूर्वी पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास १९ एप्रिल रोजी लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा इशारा उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी दिला आहे.

याबाबतचे निवेदन त्यांनी उपमुख्याधिकारी प्रमिला माने-पाटील यांना दिले आहे. यामध्ये नगरपरिषद हद्दीतील उरुणवाडी, धनगर गल्ली, यशोधननगर, साठ फुटी रिंगरोड, अशोककाका नगर, हनुमाननगर, नेहरूनगर, अवधूत कॉलनी, किसान नगर, शाहूनगर अशा भागांमध्ये गेल्या वर्षभरापासून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे.

Web Title: A warning of hunger strike for smooth water supply in Islampur