शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

सात गावांमध्ये पाण्यासाठी भटकंती

By admin | Updated: December 29, 2014 23:43 IST

माधवनगर पाणी योजना : पिण्याचे पाणीही मिळणे दुरापास्त; ग्रामस्थांमध्ये संताप

सांगली : थकित बिलापोटी महावितरणने वीज कनेक्शन तोडल्याने मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांची पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. विधानसभा निवडणूक आली की, सातही गावात संपर्क ठेवणाऱ्या व निवडणुका झाल्या की गायब होणाऱ्या लोकप्रतिनिधींनी बघ्याची भूमिका घेतल्याने ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ग्रामस्थांना प्यायला पाणीही मिळेनासे झाले आहे. ऐन थंडीत ग्रामस्थांना पहाटे उठून विहीर व कूपनलिकेतून पाणी आणण्यासाठी जावे लागत आहेत.मुळातच माधवनगरसह सात गावांची पाणी योजना सुरुवातीपासून वादग्रस्त ठरली आहे. महिन्यातून केवळ चार ते पाचवेळा या गावात पाणी येते. अनेकदा गळतीमुळे महिन्यातून केवळ दोनच वेळा पाणी येते. तेही केवळ अर्धा-पाऊण तासच असते. महिन्यापूर्वी थकबाकीमुळे वीज पुरवठा तोडण्यात आला होता. त्यावेळी तब्बल दहा दिवस पाणी सोडण्यात आले नव्हते. माधवनगर ग्रामपंचायतीने वीज बिलाची रक्कम वेळेत भरूनही इतर ग्रामपंचायतींची थकबाकी असल्याने माधवनगर पाणीयोजनेचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यामुळे विशेषत: माधवनगर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. यामुळे काही ग्रामपंचायतींनी युद्धपातळीवर वसुली करून महावितरणकडे वीज बिलाची थकबाकी भरली होती. यावेळी आता पुन्हा थकबाकीचा मुद्दा पुढे आल्याने गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडण्यात आलेले नाही. लाखो रुपयांची थकबाकी असली तरी, काही ग्रामपंचायतीकडून वसुलीसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. शिवाय महिन्यातून दोन ते तीन वेळाच पाणी सोडले जात असल्याने ग्रामस्थही पाणी बिल भरण्यास पुढे येत नाहीत.ग्रामपंचायतींकडून सध्या वसुली सुरु असली तरी, ती समाधानकारक नाही. महावितरणचे दोन कर्मचारी प्रत्येक महिन्यातील या गावातील वीज बिलांची शंभर टक्के वसुली करतात. हे कर्मचारी तर परगावचे आहेत.मात्र गावपातळीवर ग्रामपंचायत सदस्य गावचे, कर्मचारी गावचे, मग त्यांना पाणी बिलाची शंभर टक्के का वसुली होत नाही, असा सवाल सातही गावातील ग्रामस्थांमधून होत आहे. पाणीपट्टी वसुलीसाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. मनात येईल त्या प्रभागात वसुलीला जायचे. दिवसभरात पाच हजाराचीही वसुली होत नाही, अशी परिस्थिती काही ग्रामपंचायतींची आहे. सध्या पाणी नसल्याने ग्रामस्थ ऐन थंडीत मिळेल तेथून पाणी आणत आहेत. मात्र प्यायला पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी गेले कुठे?ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढविणारे लोकप्रतिनिधी आता कुठे गेले? कोट्यवधींची कामे केल्याचा डांगोरा पिटणारे लोकप्रतिनिधी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी स्वत:च्या फंडातील निधी का देत नाहीत? निवडणुका झाल्यानंतर पुन्हा गावाकडे का फिरकत नाहीत? असा सवाल सातही गावांतील ग्रामस्थ करत आहेत.