शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘वाकुर्डे’ कुण्या येड्या-गबाळ्याचे काम नव्हे

By admin | Updated: October 1, 2015 00:32 IST

शिवाजीराव नाईक : यशवंत समूहाच्या सभेत सत्यजित देशमुख, मानसिंगराव नाईक यांच्यावर टीका

कोकरूड : नाकर्तेपणामुळेच जनतेने तुम्हाला नाकारले आहे, असा टोला सत्यजित देशमुख यांचे नाव न घेता आमदार शिवाजीराव नाईक यांनी लगावला. त्याचबरोबर वाकुर्डे बु. योजनेचा प्रारंभ युतीच्या काळात झाला व त्या कामाची पूर्तताही युती शासनाच्या काळातच होणार आहे. हे कुण्या येड्या-गबाळ्याचे काम नाही, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मानसिंगराव नाईक यांचे नाव न घेता लगावला.शिराळा येथे यशवंत उद्योग समूहातील यशवंत ग्लुकोज, शिवाजी केन प्रकल्प, यशवंत दूध संघ व वारणा-मोरणा भाजीपाला संघ आदी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य रणधीर नाईक, ग्लुकोजचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, सत्यजित नाईक, पी. ई. गिरासे आदी प्रमुख उपस्थित होते.आमदार नाईक म्हणाले की, आपण मतदार संघाच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदायी असणारी वाकुर्डे बु. योजना कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असून, या योजनेतून मानकरवाडी, मोरणा, रेठरेधरण व कार्वे तलाव बारमाही भरणार आहेत. त्याबरोबरच कासेगाव पोलीस स्टेशनला शिराळा तालुक्यातील जोडलेली १० गावे कोणत्याही परिस्थितीत शिराळा पोलीस स्टेशनला जोडणार आहे. याबाबतचा पोलीस अधीक्षकांचा अहवाल गृह खात्याकडे गेला आहे. विरोधक आमच्यावर टीका करताना वस्तुस्थितीचे कोणतेही भान न ठेवता बेभानपणे आरोप करीत आहेत. जे गेल्या निवडणुकीत ३ क्रमांकावर गेले, ज्यांच्या व माझ्या मतांमध्ये ४० हजारहून अधिक मतांचा फरक आहे, त्यांना माझ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. मी गेल्या वर्षभराच्या कालावधित पेठ एम. आय. डी. सी. रद्द करून घेतली. चांदोली पर्यटन विकासासाठी ठोस पावले उचलली आहेत. येत्या दोन वर्षात ‘वाकुर्डे’ मार्गी लावणार आहे.रणधीर नाईक म्हणाले की, यशवंत ग्लुकोजने आपल्या उत्पादनाची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले असून ८७ कोटीची उलाढाल, काजू प्रक्रिया उद्योगाची ३३ लाख उलाढाल असून वीज प्रकल्पाद्वारे सव्वादोन कोटीची निर्मिती झाली आहे, तर दूध संघाच्या माध्यमातून संघाचे १ लाख लिटर दूध संकलन त्यात ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. शिवाजी केनचे १४ हजार सभासद असून तो १० महिन्यात कार्यान्वित झाला असून गतवर्षी १ लाखाचे गाळप झाले.यावेळी यशवंत दूधचे सत्यजित नाईक, अभिजित नाईक, शहाजी पाटील, सी. एच. पाटील, प्रल्हाद पाटील, एस. व्ही, पाटील, दत्ता आंदळकर गजानन पाटील, वसंत पाटील, विकास देशमुख, दिलीप कदम, उत्तम निकम, महेश पाटील, विजय पाटील, संदीप पाटील, महेश पाटील, उत्तम पाटील, सुहास कदम, युवराज यादव, प्रशांत पाटील, बी. टी. पाटील, संजय घोरपडे, विकास पाटील, के. वाय. भाष्टे उपस्थित होते.सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. यावेळी गुणवंत कामगारांचा सत्कार व उद्योग समूहाच्यावतीने आमदार शिवाजीराव नाईक यांचा सत्कार करण्यात आला. नामदेव पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)