शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

कृषी चिकित्सालयाची पलूसकरांना प्रतीक्षा

By admin | Updated: July 25, 2014 23:36 IST

जागाच नाही : २५ एकर जमिनीची आवश्यकता

आर. एन. बुरांडे ल्ल पलूस - कृष्णा आणि वेरळा नद्यांच्या कुशीतील पलूस तालुक्यातील बहुतांश शेतीक्षेत्र बागायती आहे. मात्र तालुक्यात जागाच उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना आवश्यक कृषी चिकित्सालय अद्याप सुरू झालेले नाही. पलूस तालुक्याची निर्मिती १५ वर्षांपूर्वी झाली. त्यानंतर तालुक्यासाठी आवश्यक पोलीस ठाणे, मध्यवर्ती शासकीय इमारत, तहसील कार्यालय, न्यायालय, पंचायत समिती, शासकीय गोदाम, शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, पलूस एसटी आगार यासाठी जागा उपलब्ध झाल्या आणि सुसज्ज इमारतीसुध्दा उभारण्यात आल्या, परंतु शेती विकासासाठी आजअखेर कृषी चिकित्सालयासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कृषी चिकित्सालय सुरू झालेले नाही. तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र बागायती असल्याने आणि सिंचनाचे जाळे सर्वत्र पसरल्याने येथील शेतकरी नवनवीन प्रयोग करीत असतात. निर्यातक्षम द्राक्षे, विविध प्रकारची फुले, फळभाज्या, भाजीपाला, केळी, हळद आदी पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. हरितगृहांची संख्यासुध्दा मोठी आहे. पलूस तालुका कृषी चिकित्सालयासाठी २५ एकर जमिनीची आवश्यकता आहे. कृषी चिकित्सालयात सुधारित कलमे, रोपे तयार करणे, नवनवीन जाती विकसित करून त्यांचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, जैविक खतांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान देणे, शेती औषधांची योग्यता चाचपणी प्रयोगशाळा यामधून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे सोयीचे होणार आहे. पारंपरिक शेती न करता नवीन तंत्रज्ञानाने कसदार पिकांची निर्मिती होऊन भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यामुळे औषधांमधून आणि खतांमधून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे.तालुक्यातील घोगाव, बुर्ली, नागराळे, पुणदी, पुणदीवाडी, दह्यारी, तुपारी, दुधोंडी, पलूस, सावंतपूर, कुंडल, गोंदीलवाडी, विठ्ठलवाडी, आमणापूर, अनुगडेवाडी, संतगाव, सूर्यगाव, नागठाणे, तावदरवाडी, बुरूंगवाडी, अंकलखोप, खंडोबाचीवाडी, माळवाडी, हजारवाडी, भिलवडी, वसगडे, चोपडेवाडी, खटाव, सुखवाडी, ब्रह्मनाळ या परिसरात ऊस, सोयाबीन, हळद, केळी, भाजीपाला, फळभाज्या या पिकांसाठी ठिंबक सिंचन, टिश्यू कल्चर असे प्रयोग सुरू आहेत. जर कृषी चिकित्सालयामार्फत या शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान उपलब्ध झाले, तर ते फायदेशीर ठरणार आहे.पलूस तालुक्याच्या कृषी कार्यालयासाठी मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र जागा मिळाली आहे. चिकित्सालयाला वन विभागातील २५ एकर जागा दिल्यास पलूस तालुका शेतीक्षेत्रात आघाडीवर राहणार आहे.कृषी चिकित्सालयात सुधारित कलमे, रोपे तयार करणे, नवनवीन जाती विकसित करून त्यांचे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणे, जैविक खतांच्या निर्मितीचे तंत्रज्ञान देणे, शेती औषधांची योग्यता चाचपणी प्रयोगशाळा यामधून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करणे सोयीचे होणार आहे. पारंपरिक शेती न करता नवीन तंत्रज्ञानाने कसदार पिकांची निर्मिती होऊन भरघोस उत्पादन घेता येणार आहे. यामुळे औषधांमधून आणि खतांमधून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीस आळा बसणार आहे.