शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

विटा पालिकेत उपनगराध्यक्ष बदलाच्या हालचाली गतिमान

By admin | Updated: December 23, 2015 01:15 IST

जानेवारीत निवड प्रक्रिया : सचिन जाधव यांची वर्णी शक्य

दिलीप मोहिते- विटा थील उपनगराध्यक्ष बदलासाठी हालचाली सुरू झाल्या असून, विद्यमान उपनगराध्यक्षा सौ. मालती विश्वनाथ कांबळे यांचा ठरलेला कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी फिल्डिंग लावली असली तरी, यावेळी नगरसेवक अ‍ॅड. सचिन जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जानेवारीत सौ. कांबळे राजीनामा देणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विटा नगरपरिषदेत माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची एकहाती सत्ता आहे. सत्ताधारी गटाचे १५ नगरसेवक असून, अशोकराव गायकवाड यांच्या गटाचे पाच नगरसेवक, तर विरोधी आमदार अनिल बाबर यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे तीन नगरसेवक पालिकेत कार्यरत आहेत. सध्या सत्ताधारी गटाचे वैभव पाटील नगराध्यक्ष, तर सौ. मालती कांबळके उपनगराध्यक्षा आहेत. सौ. कांबळे यांची दि. १८ मेरोजी निवड झाली. त्यावेळी या पदासाठी त्यांच्यासह सत्ताधारी गटाचेच नगरसेवक अ‍ॅड. सचिन जाधव प्रमुख इच्छुक होते. त्यांना थांबवून सौ. कांबळे यांना उपनगराध्यक्षपदाची संधी देण्यात आली. आता सौ. कांबळे यांचा कार्यकाल जानेवारी महिन्यात पूर्ण होत आहे. त्यामुळे या पदासाठी पूर्वीचे इच्छुक व नगराध्यक्ष पाटील यांचे विश्वासू अ‍ॅड. जाधव यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मालती कांबळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इच्छुकांची पुन्हा एकदा मोठी गर्दी होण्याची शक्यता असली तरी, जाधव यांनाच संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)सभापती निवडीची २८ ला प्रक्रियाविषय समित्यांच्या सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाल २९ रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, दि. २८ डिसेंबरला प्रक्रिया होत आहे. दि. २८ रोजी सकाळी ११.३० ते दु. १.३० पर्यंत अर्ज दाखल करणे, दु. १.४० पर्यंत अर्जांची छाननी, दु. १.५५ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे व त्यानंतर आवश्यकता भासल्यास मतदान घेण्यात येणार आहे. सध्या आरोग्य सभापती म्हणून सौ. स्वाती भिंगारदेवे, बांधकाम सभापतीपदी सौ. लता मेटकरी, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सौ. प्रतिभा चोथे व शिक्षण समिती सभापतीपदी किरण तारळेकर आहेत.