विद्यानिकेतन स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:28 IST2021-02-05T07:28:01+5:302021-02-05T07:28:01+5:30

इस्लामपूर : राजारामनगर-साखराळे येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रावणी रामचंद्र देसावळे, अथर्व श्रीकांत धज यांची उंचउडी क्रीडा प्रकारासाठी, तर ...

Vidyaniketan School players selected for national competition | विद्यानिकेतन स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

विद्यानिकेतन स्कूलच्या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

इस्लामपूर : राजारामनगर-साखराळे येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या श्रावणी रामचंद्र देसावळे, अथर्व श्रीकांत धज यांची उंचउडी क्रीडा प्रकारासाठी, तर अवधूत कुमार पाटील याची थाळीफेक क्रीडा प्रकारातून आसाम राज्यातील गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली.

स्कूलच्या खेळाडूंनी सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात आणि पुणे येथील राज्यस्तरीय स्पर्धेत नेत्रदीपक यश संपादन केले. १० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. थाळीफेकमध्ये सोळा वर्षे वयोगटातून अवधूत पाटील याने ४३ मीटर थाळी फेकून प्रथम क्रमांक पटकाविला. अथर्व धजने १.८० मीटर उंचउडी मारत प्रथम क्रमांकाला गवसणी घातली, तर श्रावणी देसावळे हिने १.६५ मीटर उंच उडी घेत प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. १६ वर्षीय मुली गटात गौरी प्रमोद भारती हिने ३५ मीटर थाळी फेकून, तर १८ वर्षे वयोगटात आर्य रणजित शहा याने ४७ मीटर थाळी फेक करत द्वितीय क्रमांक मिळविला.

या खेळाडूंना क्रीडाशिक्षक विजयकुमार शिंदे, विकास ताटे, एनआयएस प्रशिक्षक अजित शेळके यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे सचिव आर. डी. सावंत, अधीक्षक ए.डी. पाटील, प्राचार्य नारायण कोटूर, पर्यवेक्षक अजित पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

फोटो -०२०२२०२१-आयएसएलएम-विद्यानिकेतन न्यूज

राजारामनगर येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूलच्या यशस्वी खेळाडूंचा सत्कार प्राचार्य नारायण कोटूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजयकुमार शिंदे, विकास ताटे, अजित शेळके उपस्थित होते.

Web Title: Vidyaniketan School players selected for national competition