Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 12:24 IST2026-03-14T12:24:35+5:302026-03-14T12:24:53+5:30

प्रा. वनखंडे ‘नॉट रिचेबल’

Vankhande, Shejul named in Miraj Panyat Samiti member kidnapping case; Statement of four arrested | Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब 

Sangli: मिरज पंयात समिती सदस्य अपहरणप्रकरणात वनखंडे, शेजूळ यांची नावे; अटकेतील चौघांचा जबाब 

सांगली : मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगाव (ता. मिरज) चे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण केल्याप्रकरणी संशयित समीर अकबर होनवाडे (वय २७, रा. नरवाड), अजित मुर्ग्याप्पा कट्टीकर (वय २७), आनंद ऊर्फ गोटू बाबू गावडे (वय २७), प्रशांत बाबासाहेब क्षीरसागर (वय २०, तिघे रा. मालगाव) या चौघांना अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषणने चौघांची कसून चौकशी केल्यानंतर शिंदेसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख प्रा. मोहन वनखंडे, अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून अपहरण केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून वनखंडे व शेजूळ यांच्यावर कारवाईची शक्यता आहे.

मिरज पंचायत समिती सभापती निवडीपूर्वी बुधगावचे सदस्य पांडुरंग इंगळे यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार त्यांचा मुलगा अमर इंगळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिस याचा तपास करत होते. मंगळवारी सभापती निवडीवेळी इंगळे गैरहजर राहिल्यामुळे नाट्यमय घडामोडी घडल्या.

मंगळवारी सभापती निवडी झाल्यानंतर रात्री अपहृत सदस्य पांडुरंग इंगळे यांना प्रथम मिरजेत आणून नंतर सांगलीत सोडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर सांगली ग्रामीण पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात आणून जबाब नोंदवला. इंगळे यांचे अपहरण करून त्यांना गोव्यात नेले होते. या अपहरण प्रकरणात संशयित अपहरण प्रकरणात समीर व्हनवाडे (रा. नरवाड), अजय कट्टीकर, गोटू गावडे, क्षीरसागर (सर्व रा. मालगाव) यांचा सहभाग असल्याचेही इंगळे यांनी जबाबात म्हटले होते.

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपवला होता. सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी तपास करून संशयित समीर होनवाडे, अजित कट्टीकर, आनंद ऊर्फ गोटू गावडे, प्रशांत क्षीरसागर या चौघांना अटक केली. अटकेतील चौघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे प्रा. मोहन वनखंडे व पंचायत समितीच्या उपसभापतींचा मुलगा अजित शेजूळ यांच्या सांगण्यावरून इंगळे यांचे अपहरण केल्याचे सांगितले. चौघांचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. त्यामुळे अपहरण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणात प्रा. वनखंडे व शेजूळ या दोघांवर कारवाईची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रा. वनखंडे ‘नॉट रिचेबल’

पंचायत समिती सदस्य इंगळे यांच्या अपहरण प्रकरणात प्रा. वनखंडे आणि अनिल शेजूळ यांचा सहभाग असल्याचा जबाब अटकेतील चौघांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. प्रा. वनखंडे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मोबाइल स्वीच ऑफ असल्याचे उत्तर मिळाले.

Web Title : सांगली: पंचायत समिति सदस्य अपहरण मामले में वनखंडे, शेजुल का नाम

Web Summary : सांगली पंचायत समिति सदस्य अपहरण मामले में चार गिरफ्तार। शिवसेना के मोहन वनखंडे और अजित शेजुल का नाम सामने आया। पीड़ित को कथित तौर पर गोवा ले जाया गया, फिर रिहा कर दिया गया। पुलिस जांच जारी है, वनखंडे और शेजुल पर संभावित कार्रवाई।

Web Title : Sangli: Panchayat Samiti Member Abduction Case Exposes Vanakhande, Shejul's Involvement

Web Summary : Four arrested in Sangli's Panchayat Samiti member abduction case named Shiv Sena's Mohan Vanakhande and Ajit Shejul. The victim was allegedly taken to Goa before being released. Police investigation is ongoing, with potential action against Vanakhande and Shejul.