Sangli: खानापुरात महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची तोडफोड, गावात तणाव; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:21 IST2025-04-25T14:19:47+5:302025-04-25T14:21:11+5:30
खानापूर : येथील पापनाशिनी ओढ्याच्या काठावरील प्राचीन महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी निदर्शनास ...

Sangli: खानापुरात महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची तोडफोड, गावात तणाव; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
खानापूर : येथील पापनाशिनी ओढ्याच्या काठावरील प्राचीन महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आल्याची घटना आज, शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गावातील शिवभक्त नेहमीप्रमाणे सकाळी पूजेसाठी महादेव मंदिरात गेले असता नंदीच्या मूर्तीची शिंगे घाव घालून फोडल्याचे निदर्शनास आले. याबाबतची माहिती समजतात शिवभक्त व गावकरी मोठ्या संख्येने मंदिर परिसरात दाखल झाल्याने तणाव निर्माण झाला होता.
खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कायदेशीर प्रक्रिया चालू केल्याने तणाव निवळला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध खानापूर पोलीस दूरक्षेत्र येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तर गावचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला. या घटनेचा निषेध व्यक्त करत गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.