अतुल जाधवदेवराष्टे : ताकारी योजनेचे या वर्षातील पहिले आवर्तन सुरू झाले. मात्र आवर्तन सुरू होतात मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबची सुचना प्रशासनाला दिल्यावर ताकारी योजनेचे प्रशासन खडबडून जागे झाले. मँकँनिकल विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.ताकारी योजनेचे या वर्षातील पहिले आवर्तन आज, मंगळवारी सकाळी सुरु करण्यात आले. मात्र योजना सुरु झाल्यानंतर काही वेळातच टप्पा क्र १ वरुण टप्पा क्र २ ला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईप लाईनच्या व्हॉल्व्हला मोठे लिकेज झाले. याबाबत कोणतीही माहिती प्रशासनाला नव्हती. नागरिकांनी याबाबत माहिती दिली यानंतर प्रशासन जागे झाले. दुरुस्तीसाठी मँकँनिकल विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
सांगली: ताकारी योजनेच्या मुख्य पाईपलाईनचा व्हॉल्व्ह फुटला, लाखो लिटर पाणी वाया
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2022 16:42 IST