शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
6
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
7
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
8
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
9
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
10
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
11
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
12
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
13
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
14
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
15
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
16
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
17
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
18
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
19
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
20
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

कासेगावात आणखी दोन दारू दुकानांना परवानगी

By admin | Updated: August 18, 2015 22:48 IST

ग्रामसभेत निर्णय : विरोधकांसह ग्रामस्थांतून विरोध

प्रताप बडेकर-  कासेगाव (ता. वाळवा) येथील दारूबंदी ठरावाबाबत तीन वर्षांपासून सत्ताधारी व विरोधकांत रणधुमाळी सुरू होती. प्रत्येक ग्रामसभेत विरोधक दारूबंदी ठरावाबाबत आग्रही होते, तर सत्ताधारी अगोदर लोकप्रबोधन व त्यानंतरच दारूबंदी, असे सांगत होते. त्यामुळे ग्रामस्थांचे लक्ष या दारूबंदीकडे लागून राहिले होते. माजी ग्रामविकासमंत्री आ. जयंत पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावला जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. गावातील सर्व सत्तास्थाने त्यांच्या गटाकडेच असून विरोधी गटही प्रबळ आहे. गेल्या तीन वर्षांपासून गावात कायमची दारूबंदी व्हावी, याकरिता विरोधक प्रत्येक ग्रामसभेमध्ये दारूबंदी ठरावासाठी आवाज उठवत आहेत. मात्र सत्ताधारी गटाने याबाबत नेहमीच तळ्यात-मळ्यात अशी भूमिका घेतली. वर्षभरापूर्वी ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील यांनी, याविषयी सत्ताधारी गटाकडून सचिन पाटील व विरोधी गटातील पांडुरंग वाघमोडे यांनी एकत्रित येऊन दारूबंदीबाबत निर्णय घ्यावा असे सुचवले होते. त्यानंतर वाघमोडे यांच्यासह विरोधकांनी दारूबंदीबाबत ठरावासाठी वारंवार आवाज उठवला. परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. दारूबंदीअगोदर गावात प्रबोधन गरजेचे आहे असे सांगत, सत्ताधारी गटाने वेळ मारुन नेली. मात्र ग्रामस्थांच्या प्रबोधनाकरिता त्यांनी कोणतेही काम केले नाही.देवराज पाटील यांच्याकडून ग्रामस्थांचा अपेक्षाभंगदेवराज पाटील याबाबत सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्रामस्थांची अपेक्षा होती. परंतु १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत दारुबंदीबाबत फारशी चर्चा न होता, या सत्ताधाऱ्यांनी आणखी दोन दारू दुकाने सुरु करण्याची परवानगी देत असल्याचा ठराव संमत केला. यावेळी विरोधकांनी गोंधळ घातला. मात्र गावात दारूबंदी नसल्यामुळे अर्जांना परवानगी नाकारता येणार नाही, असे देवराज पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामसभेत दारूबंदी ठराव झालेले आहेत. मात्र कासेगावात सत्ताधाऱ्यांनी दारूच्या दुकानांना परवानगी देत, खरा चेहरा लोकांना दाखविला आहे. ग्रामस्थांत याबद्दल प्रचंड नाराजी असून, माजी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, माजी जि. प. अध्यक्ष देवराज पाटील यांचे गाव असलेल्या कासेगावसाठी हे भूषणावह नाही, असे मत माजी ग्रा. पं. सदस्य ज्ञानदेव पाटील यांनी व्यक्त केले.गावाला मोठा राजकीय व क्रीडा इतिहास आहे. मात्र सत्ताधारी मंडळींनी गावात दारूच्या दुकानांना परवानगी देत तरुण पिढीला बरबाद करण्याचे ठरवले आहे. महिला सरपंचांनीही परवान्याचे समर्थन केले.- नेताजी पाटील, विरोधी नेते, ग्रामपंचायत, कासेगाव.