शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

एरंडोलीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांची घरपट्टी वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:19 IST

सांगली : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका ...

सांगली : एरंडोली (ता. मिरज) ग्रामपंचायतीत बोगस पावत्यांद्वारे दोन लाखांहून अधिक रकमेची घरपट्टी गोळा करण्यात आली. या पैशांचा एका शिपायाने अपहार केल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीकडे नोंद नसलेल्या पावती पुस्तकांचा वापर शिपायाने केल्याची माहिती सरपंच वासंती धेंडे यांनी दिली. याद्वारे वसूल केलेली रक्कम सुमारे दोन लाखांहून अधिक असल्याचा अंदाज आहे. वसुली अपेक्षेहून कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर धेंडे यांनी सतत दोन महिने लक्ष ठेवले. काही मालमत्ताधारकांशी चर्चा केली. त्यांनी घरपट्टी भरल्याचे सांगत पावत्याही दाखवल्या. धेंडे यांनी ग्रामपंचायतीत पडताळणी केली असता, संबंधित मालमत्ताधारकांच्या नावे थकबाकी कायम असल्याचे दिसले, शिवाय त्यांनी दाखवलेल्या पावत्या ग्रामपंचायत दफ्तरी नोंद नसल्याचेही आढळले.

यावेळी चौकशीअंती शिपायाकडे नोंद नसलेली पावती पुस्तके सापडली. ती कोठून मिळवली, याचा माग काढला जात आहे. नोव्हेंबर २०२० ते एप्रिल २०२१ या काळात वसुलीसाठी पुस्तके वापरली गेली आहेत. त्यावर त्याच्या सह्यादेखील आहेत. वसूल घरपट्टीचा भरणा ग्रामपंचायतीच्या बॅक खात्यात केलेला नाही. यामुळे सरपंचांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल केली. डुडी यांच्या सूचनेनुसार मिरज पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सदाशिव मगदूम या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

डुडी म्हमाले की, अनधिकृत पावत्यांद्वारे घरपट्टी वसुली ही गंभीर बाब आहे. याची सखोल चौकशी करु. संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. सरपंच धेंडे म्हणाल्या, ग्रामपंचायतीच्या पैशांचा अपहार धक्कादायक आहे. यापूर्वीच्या वसुलीच्या ऑडिटचीही मागणी करणार आहोत.