शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विठलापुरात दोन गटांत धुमश्चक्री

By admin | Updated: July 26, 2015 00:16 IST

पोलिसांचा लाठीहल्ला : दंगल नियंत्रण पथकासह पोलीस तैनात

आटपाडी : तालुक्यातील आठ गावांच्या ग्रामपंचायतींसाठी अत्यंत चुरशीने शनिवारी ८२.५९ टक्के एवढे मतदान झाले. विठलापूर येथील मतदान केंद्र क्रमांक एकसमोर शनिवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास दोन राजकीय गटांत पोलिसांसमोरच हाणामारी झाली. काहींनी दगडफेकही केली. पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला. याठिकाणी तणावपूर्ण स्थिती असून, दंगल नियंत्रण पथकासह सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. किरकोळ वादावादी आणि बाचाबाचीचे प्रकार वगळता सकाळपासून सर्वत्र शांततेत मतदान झाले होते. सकाळी मतदारांनी मतदान केंद्रासमोर रांगा लावल्या. दुपारी मतदारांची मतदान केंद्रासमोरील गर्दी कमी झाली. मात्र, सायंकाळी पुन्हा मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी केंद्रावर पोहोचले. विठलापूर या संवेदनशील गावात यावेळी तिरंगी निवडणूक होत आहे. तिथे सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मात्र, सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास केंद्र क्रमांक १ समोर दोन गटांत मतदाराच्या ओळखीच्या पुराव्याच्या कारणावरून जोरदार मारामारी झाली. त्यावेळी काहींनी दगडफेक केली. तत्काळ पोलिसांची जादा कुमक तिथे पोहोचली. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. मतदान केंद्राच्या परिसरातून सर्वांना पिटाळण्यात आले. याप्रकरणी हवालदार नामदेव गोडसे यांनी सिद्धेश्वर बाड, सोपान ऊर्फ बाळासाहेब बाड, जालिंदर पांडुरंग बाड आणि बापू संदीपान बाड या चौघांविरुद्ध भा. दं. स. कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सध्या दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा बंदोबस्त गावात तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी तहसीलदार जोगेंद्र कट्यारे आणि गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी भेट दिली. (वार्ताहर) दुय्यम निबंधकांवर गुन्हा दाखल आटपाडीचे दुय्यम निबंधक डी. एम. काळे यांची मतदान क्षेत्रीय अधिकारी म्हणून नेमणूक केली असताना, ते गैरहजर राहिले. आदेशाचा भंग करून कर्तव्यात कसूर केली म्हणून तहसील कार्यालयातील अव्वल कारकून उत्तम कांबळे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मालगावात वादावादी, लक्ष्मीवाडीत दगडफेक मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे मनोज शिंदे व केदारराव शिंदे गटाच्या समर्थकांच्या बाचाबाचीनंतर पोलिसांनी मतदान केंद्रांच्या आवारातील जमावाला पांगविण्यासाठी लाठीहल्ला केला. तालुक्यातीलच मालगाव व कळंबीत मतदानप्रसंगी दोन गटांत वादावादी झाली. लक्ष्मीवाडी येथे शनिवारी दुपारी अज्ञातांनी ग्रामपंचायतीजवळ बंदोबस्तासाठी असलेल्या राज्य राखीव दलाच्या जवानांवर दगडफेक केली. राज्य राखीव दलाच्या जवानांनी जमावाला चोप देऊन पिटाळून लावले.