शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

दोन दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगलीत शुक्रवारी भाजी मंडईत गर्दी झाली होती. फोटो : ०९०४२०२१एसएएन०२ : ‘वीकेंड लॉकडाऊन’ला सुरुवात ...

दोन दिवसाच्या कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगलीत शुक्रवारी भाजी मंडईत गर्दी झाली होती.

फोटो : ०९०४२०२१एसएएन०२ :

‘वीकेंड लॉकडाऊन’ला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सांगलीत पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनचालकांना हटकले जात होते.

फोटो : ०९०४२०२१एसएएन०३ :

‘वीकेंड लॉकडाऊन’ला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी रात्री सांगलीतील विश्रामबाग उड्डाण पुलावर शुकशुकाट होता.

(सर्व छायाचित्रे : सुरेंद्र दुपटे)

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन दिवस कडक लॉकडाऊन असणार आहे. शुक्रवारी रात्री आठनंतर सुरू झालेले लॉकडाऊन सोमवारी सकाळी सातपर्यंत असेल. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असतीलच, शिवाय नागरिकांना विनाकारण फिरण्यासही बंदी आहे. दरम्यान, शुक्रवारी खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. भाजीपाल्यासह किराणा खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र होते.

राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ नियमावलीनुसार वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यात शुक्रवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी सातपर्यंत पूर्ण संचारबंदी लागू असणार आहे. शनिवार व रविवार हे दोन्ही दिवस पूर्ण लॉकडाऊन असणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सोमवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद आहेत. गेल्या पाच दिवसात यास संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. नागरिकही दिवसभर बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आता शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मात्र पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. वैद्यकीयसह इतर कारणांसाठी बाहेर पडणाऱ्यांकडे त्याबाबतचे सबळ कारण आवश्यक आहे. अत्यावश्यक सोडून इतर सेवा बंद राहणार असल्याने विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री आठपासूनच प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

चौकट

लॉकडाऊन आणि पुन्हा गर्दी

शनिवारी, रविवारी कडक लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारी सर्व बाजारपेठेत मोठी गर्दी होती. भाजीपाल्यासाठी तसे किराणा दुकानात रांगा लागल्या होत्या. इतर व्यावसायिकांनीही दुकानांची शटर उघडली होती. शहरातील मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, शिवाजी मंडई परिसरात उभे राहायलाही जागा नव्हती. गर्दीमुळे कोरोनाविषयक उपाययोजनांचा मात्र फज्जा उडाल्याचे दिसून आले.

चौकट

या सेवा राहणार सुरू...

रुग्णालये, औषध दुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने, भाजीपाला विक्री केंद्रे उघडी राहणार आहेत. हॉटेल्समधून केवळ होम डिलिव्हरी सेवा सुरू राहील. अत्यावश्यक कारणासाठी प्रवासी सेवा, मालवाहतूक सेवा, शेतीविषयक कामे, त्यासाठी लागणाऱ्या साधनांची वाहतूक, दूध वाहतुकीसह इतर अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. प्रवासासाठी योग्य सबळ कारण असेल, तरच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.