शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीनेच माधवनगर पाणी योजना अडचणीत

By admin | Updated: November 19, 2014 23:25 IST

कूपनलिकांचा आधार : आरोग्याचा प्रश्न झाला गंभीर

गजानन साळुंखे -माधवनगरसह सात गावांची नळ पाणीपुरवठा योजना वाढत्या थकबाकीमुळे अडचणीत आली असून, पाणीपट्टी वेळेत न भरण्याची ग्रामस्थांची मानसिकता, वारंवार होणारी पाणी गळती, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, शासकीय यंत्रणेची चालढकल भूमिका यामुळे नळ पाणीपुरवठा योजनेचा पांढरा हत्ती पोसणे अवघड झाले आहे.प्रचंड संघर्षानंतर वीस वर्षांपूर्वी ही योजना सुरू झाली. सुरूवातीपासूनच योजना कोणी चालवायची, यावरून मतभेद होते. जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती यांच्या वादात ही योजना सर्व ग्रामपंचायतींची शिखर समिती या गोंडस नावाखाली माधवनगर ग्रामस्थांच्या गळ्यात मारण्यात आली. या समितीवर योजना चालविणे, पाणीपट्टी भरणे, गळती काढणे आदी जबाबदारी देण्यात आली. प्रत्यक्षात जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींना ही योजना चालविणे अशक्य होते, तेथे सर्वदृष्ट्या दुबळी व अधिकारहीन शिखर समिती ही योजना कोणत्याआधारे चालवेल, हे कोणत्या तर्कावर निश्चित केले, हा संशोधनाचा विषय आहे. सध्या या समितीचा सर्वात जास्त वेळ पाणीपुरवठा योजनेची गळती काढण्यावर जात आहे. या सातही ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. गावातून पाणीपट्टी गोळा होण्याचे प्रमाण हे पंधरा ते वीस टक्के आहे. काही मोजकेच ग्रामस्थ स्वत:हून ग्रामपंचायतीमध्ये जाऊन पाणीपट्टी भरतात. ग्रामपंचायतीकडेही पाणीपट्टी वसुलीची सक्षम यंत्रणा नाही. ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचीही या वसुलीसाठी ठोस भूमिका दिसत नाही. जेव्हा थकबाकीमुळे पाणी योजना बंदचे प्रसंग येतात, तेव्हा जिल्हा प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक यांना फैलावर घेते. आकारली जाणारी पाणीपट्टी आणि प्रत्यक्ष वसुली यात मोठी तफावत आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींचा इतर निधी, शासन अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान या पाणीपट्टीपोटी भरून ग्रामपंचायती वेळ मारून नेतात. पाणी गळतीवरही मोठा खर्च करावा लागतो.बुधवारीही पळापळबुधवारी माधवनगर पाणीपुरवठा योजना पूर्ववत होईल, असे वाटत असतानाच दिवसभर पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरूच होती. आता गुरुवारी योजना सुरू होईल, असे सांगितले जात आहे. पाणीपुरवठा यंत्रणेच्या अभ्यासाची गरजमाधवनगर ग्रामपंचायतीने मध्यंतरी योजनेतून गावात येणारे पाणी, प्रत्यक्ष टाकीत पडणारे पाणी, गावाला मिळणारे पाणी आणि गळतीमुळे वाया जाणारे पाणी याचा अभ्यास केला. त्यातून अनेक गैरप्रकार उघडकीस आले. प्रत्यक्ष गावाला मिळणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक पाण्याचे बिल माधवनगर ग्रामपंचायत भरत होती. याचा शासनाकडे पाठपुरावा झाला आणि माधवनगरचे आर्थिक हित जपले गेले. याप्रमाणे इतरही सहा गावांनी हीच पध्दत अवलंबणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे सांबरवाडी हे गाव या योजनेचे पाणी वापरत नसले तरीही, ग्रामपंचायतीला त्याचे बिल येत आहे. कांचनपूर गावाला वर्षातून मोजक्याच वेळा पाणीपुरवठा होतो.