शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक बँक अध्यक्ष पदासाठी ‘तुकाराम-हरी’चा जयघोष

By admin | Updated: April 30, 2015 00:23 IST

नेत्यांचे संकेत : मिरज तालुक्याला संधीची शक्यता

प्रवीण जगताप -लिंगनूर --सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या निवडणुकीत शिक्षक समितीने तेरा संचालकांच्या जोरावर सत्ता मिळवली आहे. आता बॅँकेच्या अध्यक्ष पदाची चर्चा सुरू झाली आहे. मिरजेने दिलेले मताधिक्य, कार्यकर्त्यांचे जाळे, समितीचा बालेकिल्ला, कार्यकर्त्यांची मागणी आणि मागील पाच वर्षात अध्यक्ष पदाची न मिळालेली संधी, यामुळे मिरज तालुक्यालाच अध्यक्ष पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आरग येथील हरीबा गावडे आणि तुकाराम गायकवाड अध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. नेत्यांनीही विजयानंतरच्या बैठकीत तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी ‘तुकाराम-हरी’चा जयघोष सुरू झाला आहे.यंदा प्रथमच शिक्षक बॅँकेसाठी नव्या सहकारी कायद्यानुसार मतदान झाले होते. त्यामुळे मिरज, जत व वाळवा या अधिक सभासद असणाऱ्या दोन तालुक्यांना महत्त्व प्राप्त झाले. मिरज तालुक्यात समितीच्या उमेदवारांना जादा मताधिक्य मिळाले. त्याचा फायदा जिल्ह्यातील अन्य उमेदवारांना झाला. मिरज तालुक्यातील नेत्यांनी बालेकिल्ला मजबूत असल्याचेच सिद्ध केले. त्यात राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, हरीबा गावडे, तुकाराम गायकवाड, श्रेणिक चौगुले यांनी विशेष परिश्रम घेतले. समितीच्या स्थापनेपासून मिरज तालुक्यात समितीचेच वर्चस्व राहिले आहे, तर बॅँकेच्या विजयानंतर झालेल्या बैठकीतही मिरज तालुक्याला संधी देण्याबाबत विचार करू, असे संकेत समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर यांनी दिले आहेत. पार्लमेंटरी बोर्ड, समितीचे नेते आता कोणत्या तालुक्याला संधी देणार, याकडे मिरज तालुक्यातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.तुकाराम-हरीची जोडगोळी आभारातही पुढेअध्यक्ष पदासाठी हरीबा गावडे आणि तुकाराम गायकवाड प्रबळ दावेदार आहेत. गावडे २४ वर्षांपासूनचे समितीचे कट्टर कार्यकर्ते असून, मिरज तालुक्याच्या अध्यक्षपदी आठ वर्षे, तर सध्या जिल्हा कोषाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या संघटनकौशल्यामुळे कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत बनले आहे. तुकाराम गायकवाड हेही समितीचे सर्वात जुने कार्यकर्ते आहेत. त्यांनीही समितीच्या जिल्हा सहसचिव पदावर काम केले आहे. शिवाय वारकरी संप्रदायातून ते तालुक्यात परिचित आहेत. विनम्रता, कार्यकर्त्यांशी जवळीक यातून ते थेट अध्यक्ष पदाच्या दावेदारीपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे तालुक्यात ‘तुकाराम-हरी’चा जयघोष घुमत आहे. विशेष म्हणजे दोघेही वेळात वेळ काढून एकत्रित आभार दौरा करीत आहेत.