शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण सेवक सोसायटी सभेत गोंधळ

By admin | Updated: July 27, 2015 00:30 IST

कर्जमर्यादा वाढविणार : पेठभाग शाखेतील भ्रष्टाचाराच्या खुलाशाची मागणी

सांगली : पेठभाग शाखेमध्ये भ्रष्टाचार झाला असून, याबाबत खुलासा करण्यात यावा, या मागणीवरून येथील शिक्षण सेवक सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एन. डी. बिरनाळे होते.येथील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात रविवारी शिक्षण सेवक सोसायटीची ८२ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपाध्यक्ष संतोषकुमार गायकवाड, संचालक रवींद्र गवळी, सौ. अनुजा पाटील, अंजनी साळुंखे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. अध्यक्ष बिरनाळे अहवाल वाचन करीत असतानाच विरोधकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संस्थेच्या पेठभाग शाखेत इमारत दुरुस्ती व इतर कारणांवरून पंधरा लाखांचा भ्रष्टाचार झाला असून, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी विकास पाटील, बजरंग संकपाळ आदींनी केली. संचालक मंडळाने, विकास पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमतो, तुम्हीच याची चौकशी करावी, अशी सूचना केली. त्यानंतर वाद सुरू झाला. संचालक मंडळाचा कालावधी आता संपला असून, यासंदर्भात वेळकाढू धोरण अवलंबिण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. आॅनररी सचिव पदाचा राजीनामा देणाऱ्यांची पुन्हा तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती कशी करण्यात आली? असाही प्रश्न सभेत उपस्थित झाल्याने वादाला सुरुवात झाली. आॅनररी सचिव यापूर्वी संचालकपदी होते व त्यांच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचा खुलासा संचालकांनी केला. प्रत्येकवर्षी संस्थेचे आॅडिट शुल्क अकरा लाख होत असताना, यावर्षी ६ लाखच कसा खर्च झाला? यापूर्वी खर्च अधिक कसा झाला? असा प्रश्न उदय पाटील, दत्ता पाटील आदींनी केला. यावर यावर्षी शासनाने आॅडिट शुल्क कमी केल्याचे सांगण्यात आले. यावरून समाधान न झाल्याने विरोधकांनी गोंधळ सुरूच ठेवला.अध्यक्ष बिरनाळे म्हणाले की, सध्याची कर्जमर्यादा बारा लाखांची असून, ती अपुरी आहे. सर्वांच्या मागणीनुसार कर्जमर्यादा वीस लाखाची करण्याचा प्रस्ताव असून तो सहकार मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. संस्थेने भागभांडवलावर १३.२५ टक्के लाभांश दिला असून, भागभांडवलात ३ कोटी ४८ लाख ३ हजाराने वाढ झाली आहे. यावर्षी संस्थेच्या ठेवींत २५ कोटी ४१ लाखाची वाढ झाली असून कर्ज वितरणात १७ कोटी २० लाखाची वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)केवळ विरोधासाठी विरोध : बिरनाळेविरोधकांकडे कोणतेही मुद्दे नव्हते. त्यांनी केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे धोरण अवलंबल्यामुळेच सभेत गोंधळ झाला, असा आरोप अध्यक्ष बिरनाळे यांनी केला. संस्थेने यंदाच्या आर्थिक वर्षात चौफेर प्रगती केली आहे. याचे आकडे आहेत. आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचा गोंधळ होता, त्यामध्ये काहीही तथ्य नव्हते. विरोधकांनी मात्र ही सभा गुंडाळल्याचा आरोप केला. स्वागत उपाध्यक्ष संतोषकुमार गायकवाड यांनी केले, तर अहवाल वाचन रवींद्र गवळी यांनी केले. यावेळी विजयकुमार बोराडे, मनोहर शिंदे, सर्जेराव पाटील, संताजी घाडगे, अर्जुन पाटील, मोहन वनखंडे आदी उपस्थित होते.