ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

By Admin | Updated: December 29, 2016 00:08 IST2016-12-29T00:08:04+5:302016-12-29T00:08:04+5:30

जतजवळ अपघात : दहा दिवसांतील तिसरी घटना

Trolley beats a biker killed | ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

जत : ऊस भरून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला दुचाकीची पाठीमागून धडक बसून केरू लाजाप्पा पाटील (शेजूळ) (वय ५८, रा. खलाटी, ता. जत) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना जत-सांगली रस्त्यावर जतपासून चार किलोमीटर अंतरावरील नवनाथ ढाब्याजवळ मंगळवारी रात्री आठ वाजता घडली. रात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघाताची दहा दिवसांतील ही तिसरी घटना असून, यात आतापर्यंत पाच बळी गेले आहेत.
खलाटी येथील केरू पाटील मंगळवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १० बी डब्ल्यू ३१८३) डफळापूरकडून जतकडे येत होते. यावेळी नवनाथ ढाब्याजवळ उसाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली (एमएच १० बीझेड ८६४) उभी होती. रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या अंधारात पाटील यांना ट्रॅक्टर-ट्रॉली दिसली नाही. त्यांच्या भरधाव वेगातील दुचाकीने ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये
डोक्यास गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री उशिरा जत पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्री रस्त्यावर थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून झालेल्या अपघाताची दहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे. दोनच दिवसांपूर्वी मिरजेजवळ अशा अपघातात तिघे ठार झाले होते. दहा दिवसांत ट्रॅक्टर-ट्रॉलीला धडकून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. (वार्ताहर)

Web Title: Trolley beats a biker killed