शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

नेवरीमध्ये बसणार ट्रान्स्फॉर्मर

By admin | Updated: September 3, 2015 23:40 IST

ऊर्जामंत्र्यांकडून आत्मदहनाच्या इशाऱ्याची दखल : ऊर्जा मंत्रालयाची माहिती

गणेश पवार- नेवारी नेवरी (ता. कडेगाव) येथील सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वीज ट्रान्स्फॉर्मरच्या कामाबाबत शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये गुरुवारी प्रसिध्द होताच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन, तात्काळ ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात यावा, असा आदेश दूरध्वनीवरून दिला. त्यानंतर येत्या दोन दिवसात ट्रान्स्फॉर्मर बसविण्याच्या सूचना कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आर. बी. बुरूड यांनी दिल्या. गेल्या सहा महिन्यांपासून या परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. ठेक ा दिलेल्या कंपनीच्या मनमानीमुळे ट्रान्स्फॉर्मर बसविण्याकडे दुर्लक्ष केले जात होते. या परिसरात दीड हजार एकर ऊसक्षेत्र आहे. शेतक ऱ्यांनी कर्जे उचलून पाणी योजना राबविल्या आहेत. येरळा नदीमध्ये ताकारी योजनेचे पाणी असूनही, ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ट्रान्स्फॉर्मर बसविला नाही. परिणामी शेतकऱ्यांना शेतीला पाणी देता येत नाही. वीज कंपनीच्या स्थानिक कार्यालयाकडे हेलपाटे मारून शेतकरी वैतागले होते. शेवटी शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर मुंबईपासून कोल्हापूर-सांगलीपर्यंत दूरध्वनी वाजू लागले आणि सहा महिन्यांचे प्रलंबित काम ‘लोकमत’च्या वृत्ताने एका दिवसात मार्गी लागले. येत्या दोन दिवसात ट्रान्स्फॉर्मर चालू करण्याची माहिती कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आर. बी. बुरूड यांनी दिली. नेवरी विद्युत महामंडळ कार्यालयातील कनिष्ठ अभियंता एस. ए. पवार यांचे काम पूर्ण झाले असून वरिष्ठ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळेच काम अपुरे आहे, अशी कार्यालयातून माहिती मिळाली. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता यांनाही ऊर्जा कार्यालयातून काम पूर्ण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.‘लोकमत’चे कौतुक गुरुवारी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिल्याने अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. दुपारी बारा वाजल्यापासून पाचपर्यंत ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा निर्णय कोल्हापूर वरिष्ठ कार्यालयातून घेण्याचे निश्चित झाले. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ वर्गातून ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. नेवरीच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तात्काळ ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचे फर्मान महावितरणच्या अधिकाऱ्यांना सोडले आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. संबंधित कार्यालयाकडे दूरध्वनीद्वारे काम सुरू करावे, असे आदेशही देण्यात आले.