शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या आवाहनानंतर व्यापाऱ्यांचे आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:23 IST

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत सांगलीतील व्यापारी एकता असाेसिएशनने ...

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यापाऱ्यांना आंदोलन न करण्याचे आवाहन केल्यानंतर त्यास प्रतिसाद देत सांगलीतील व्यापारी एकता असाेसिएशनने सोमवारपासून दुकान उघडण्याचे पुकारलेले आंदोलन मागे घेतले. जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनीही याप्रश्नी व्यापाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली व प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.

व्यापारी एकता असोसिएशनने पाच दिवसांच्या निर्बंधास विरोध दर्शविला होता. हे निर्बंध मागे न घेतल्यास व्यापारी सोमवारी १२ एप्रिलपासून दुकाने उघडतील, असा इशारा दिला होता. सांगली जिल्ह्यासह राज्यभर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कडक लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा व पालकमंत्री जयंत पाटील यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. जयंत पाटील म्हणाले की, व्यापाऱ्यांचे लॉकडाऊनमुळे नुकसान होत असल्याची कल्पना असून, कोरोनाशी लढण्याकामी व्यापाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. कोरोनाचा संसर्ग गतीने वाढत असून, परिस्थिती कठीण बनली आहे. त्यामुळे त्यांनी शासनाच्या निर्णयांना बळ द्यावे, असे आवाहन केले.

यावर समीर शहा यांनी आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले, मात्र शासनानेही व्यापाऱ्यांच्या नुकसानीबाबत विचार करावा व त्यांना साथ द्यावी, असे आवाहन केले. व्यापाऱ्यांमध्ये अजूनही होणाऱ्या नुकसानीमुळे चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना मदतीची भूमिकाही शासनाने घ्यावी, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांनी याबाबत शक्य तो सकारात्मक विचार होईल, असे स्पष्ट केले.

पोलीसप्रमुख गेडाम यांनीही शहा यांच्याशी चर्चा करून आंदोलन न करण्याविषयी आवाहन केले. सर्वांच्याच आरोग्याचा हा प्रश्न असल्याने व पोलिसांवर वाढता ताण असल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले.