Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2023 18:59 IST2023-11-03T18:57:33+5:302023-11-03T18:59:01+5:30
डोक्याला गंभीर दुखापत झाली

Sangli: वडीलाच्याच ट्रॅक्टरला धडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ
विकास शहा
शिराळा: येथील औद्योगिक वसाहतीमध्ये वडीलच चालवत असलेल्या ट्रॅक्टरच्या मागील चाकास धडकल्याने स्वतःचा एक वर्षाचा मुलगा ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. हितेश सिहेनसिंग सिंगार (रा भेडदा, तहसिल पेटलावद, जिल्हा जाबुवा रा. मध्यप्रदेश सध्या रा. इनफ्रा मार्केट कंपनी, औद्योगिक वसाहत शिराळा) असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना आज, शुक्रवार सकाळी घडली. घटनेची फिर्याद मयत हितेशची आई किला सिहेनसिंग सिंगार यांनी दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सिहेनसिंग पागला सिंगार हे कुटुंबीय मोलमजुरीसाठी चारच महिन्यांपूर्वी शिराळा औद्योगिक वसाहतमध्ये असलेल्या इन्फ्रा मार्केट कंपनीमध्ये राहायला आले होते. सिहेनसिंग सिंगार हे ट्रॅक्टर (एम एच १० - एस ५४३६ ) पाठीमागे घेत असताना ट्रॉलीच्या उजवे बाजूचे चाकास हितेश धडकला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यास तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हितेश हा मयत झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी संशयित आरोपी सिहेनसिंग सिंगार हा घटनेस कारणीभूत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास भाऊसाहेब कुंभार हे करीत आहेत. मयत हितेश याच्या पश्चात आई, वडील, एक बहीण, आजी, आजोबा असा परिवार आहे. मयत हितेश याचा मृतदेह मध्यप्रदेश येथील मूळ गावी अंत्यसंस्कार साठी नेण्यात आला आहे.