शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली परिसरात वाघांची शिकार

By admin | Updated: September 3, 2015 23:44 IST

एकाच वाघाचे अस्तित्व : तस्करीमुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा

गंगाराम पाटील - वारणावती  चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून, इस्लामपुरातील वाघांची कातडी व नख्यांच्या तस्करी प्रकरणामुळे निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. वनक्षेत्रपाल व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे उद्यानामध्ये वन्यप्राण्यांची चोरटी शिकार होत आहे. वाघांची चोरटी शिकार रोखण्याचे मोठे आव्हान वन विभागासमोर आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील वाघांच्या वाढीला पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी केंद्राने या प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. राज्यातला हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे. या व्याघ्र प्रकल्पासाठी कोयना अभयारण्याच्या ४२३.५५ व चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या ३१७.६७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा समावेश केलेला आहे. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम टोकावर चांदोली अभयारण्य आहे. या अभयारण्याचे क्षेत्र सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सरहद्दीवर आहे. नैसर्गिक व निर्मनुष्य असणारे राज्यातले हे सर्वांत मोठे अभयारण्य आहे. हे अभयारण्य निर्मनुष्य होण्यासाठी चांदोली धरणामुळे अडचणीत आलेल्या सांगली जिल्ह्यातील १४ गावे व कोल्हापूर जिल्ह्यातील १४ गावांचे व रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावाचे पुनर्वसन झाले. पुनर्वसन होऊन ती गावे त्या-त्या जिल्ह्यांच्या अन्य तालुक्यात गेली. जाताना त्यांनी घरेदारे मोडून मोडका-तोडका संसार गाड्या भरून नेला आणि चांदोलीचे अभयारण्य निर्मनुष्य झाले. प्राण्यांची संख्या वाढू लागली. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटातील कोयना अभयारण्य व चांदोली राष्ट्रीय उद्यानात वाघांचे अस्तित्व असल्याने केंद्राने या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला ५ जानेवारी २०१० ला मान्यता दिली आहे. गैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवाल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे. इस्लामपुरातील वाघांच्या कातडीच्या तस्करी प्रकरणामुळे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील चोरट्या शिकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये केवळ एकाच वाघाचे अस्तित्व आढळत असल्याने चांदोली उद्यानामध्ये अनेक वाघांची शिकार झाली असण्याची शक्यता असून त्याची निसर्गप्रेमींमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. बिबट्यांचे अस्तित्वही कमी झालेगैरसमजुतीतून या प्रकल्पाविषयी लोकांत नाराजी दिसत असली तरी, वाघांच्या चोरट्या शिकारीमुळे वाघाची संख्या घटत आहे. वाघांचे व बिबट्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी नेमके करतात काय, असा सवल निसर्गपे्रमींतून विचारला जात आहे.