Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 12:39 IST2026-03-30T12:38:51+5:302026-03-30T12:39:08+5:30

वाळवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून महिलेसह तिघांनी वाळवा येथे एकाचा दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करून निर्घृण ...

Three men including a woman, murdered a young man in Walwa harboring resentment over a previous fight | Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक

Sangli Crime: पूर्वीच्या भांडणाचा राग; वाळव्यात भरवस्तीत तरुणाचा दगडाने ठेचून खून, आई-मुलांसह तिघांना अटक

वाळवा : पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून महिलेसह तिघांनी वाळवा येथे एकाचा दगडाने ठेचून आणि काठीने मारहाण करून निर्घृण खून केला. रविवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम (वय ३०, रा. वाळवा माळभाग) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी अशोक भीमराव कदम यांनी आष्टा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रथमेश ऊर्फ बबलू आमसिद्ध कोळी, अभिजित ऊर्फ सोन्या टुमक्या परीट आणि राजश्री आमसिद्ध कोळी (सर्व रा. वाळवा, ता. वाळवा) यांना अटक केली आहे. वाळवा ते आहिरवाडी रस्त्याला, रॉयल हॉटेलजवळ देसाई प्लॉट येथे राजश्री आमसिद्ध कोळी हिच्या राहत्या घरात संदेश ऊर्फ साहिल अशोक कदम याला प्रथमेश कोळी आणि अभिजित परीट यांनी बोलावून घेतले.

तेथे पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणांवरून राजश्री कोळी हिच्यासह तिघांनी संदेश याला दारू पाजून डोक्यात काठीने व दगडाने मारहाण करत त्याचा निर्घृण खून केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संदेशला घराबाहेर थोड्या अंतरावर नेऊन टाकले.

तिन्ही संशयित ताब्यात

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फाॅरेन्सिक पथक दाखल झाले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. दुपारपर्यंत पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.

Web Title : सांगली: पुराने झगड़े में बेरहमी से हत्या; तीन गिरफ्तार।

Web Summary : सांगली के वालवा में, एक पुराने विवाद के चलते 30 वर्षीय व्यक्ति की हत्या कर दी गई। एक महिला और उसके बेटे सहित तीन लोगों ने पत्थरों और डंडों से बेरहमी से हत्या की, जिन्हें अब गिरफ्तार कर लिया गया है। पुलिस जांच कर रही है।

Web Title : Sangli: Old feud leads to brutal murder; three arrested.

Web Summary : In Walwa, Sangli, an old dispute resulted in the murder of a 30-year-old man. He was brutally killed with stones and sticks by three individuals, including a woman and her son, who are now arrested. Police are investigating.