शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
2
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
3
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
4
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
5
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
6
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
7
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
8
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
9
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
10
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
11
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
12
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
13
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
14
बजाजचा बाजारात धमाका! नवीन Pulsar NS400Z लॉन्च; किंमत झाली कमी अन् फीचर्समध्येही तडजोड नाही
15
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
16
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
17
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
18
राजश्री देशपांडेने आत्मविश्वासाने दाखवल्या ब्रेस्ट कॅन्सरच्या खुणा, फोटो शेअर करत म्हणाली...
19
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
20
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील तिघा वारकऱ्यांना बेदम मारहाण, मालगावजवळ घटना

By हणमंत पाटील | Updated: July 18, 2024 23:59 IST

सराईत गुन्हेगाराचे कृत्य, रस्त्यातील गाडी काढण्यावरून वाद

मिरज : मिरज ते मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे पंढरपूरहून बेळगावकडे परतणाऱ्या वारकऱ्यांना किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली. जखमी झालेल्या तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव जिल्ह्यातील तुरमुरी या सीमाभागातील ३० वारकरी पंढरपूरमध्ये आषाढी वारी करून गुरुवारी ट्रकमधून (केए २२ डी ८५३५) गावी परत जात होते. यावेळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावरून ट्रक मिरजेकडे जाण्याऐवजी मालगावच्या दिशेने गेला. 

मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे एक चारचाकी वाहन रस्त्यात उभे केले होते, त्यामुळे ट्रक पुढे जाऊ शकत नव्हता. ट्रकचालक व वारकऱ्यांनी चारचाकी वाहन काढण्याची विनंती वाहनचालकाला केली. त्यातून ट्रकचालक श्रीकांत मनवाडकर (वय ५५, रा. शिवाजीनगर, बेळगाव) यांच्यासोबत काही जणांचा वाद झाला. त्यातूनच मनवाडकर यांना जमावाने बेदम मारहाण केली.

मालगावातील एका सराईत गुन्हेगारासह सुमारे वीस जणांच्या जमावाने ट्रक रोखून वारकऱ्यांवर हल्ला चढवला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे वारकऱ्यांत हलकल्लोळ उडाला. ट्रकमधील वृद्ध व महिला वारकरी, बालके भयभीत झाले होते. ट्रकचालक मनवाडकर यांना कुऱ्हाडीचा दांडा व ट्रकवरील झेंड्याची काठी काढून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. 

त्यांना वाचविण्यासाठी आलेले वारकरी परशुराम जाधव व तुरमुरीचे ग्रामपंचायत सदस्य, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते सुरेश राजूरकर यांनादेखील जमावाने बेदम मारहाण केली. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी वारकरी आले होते. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता. 

टॅग्स :Sangliसांगली